पाकिस्तानने घेतली नवीन क्षेपणास्त्राची चाचणी

रावळपिंडी – जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या नवीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची आज पाकिस्तानच्या लष्कराच्यावतीने चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र डागण्याच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली.
सुधारित अचूकता आणि वर्धित क्षमता यासाठी विविध तांत्रिक मापदंडांचे प्रमाणीकरण आणि विविध उप-प्रणालींचे क्षमता मूल्यमापन या चाचणीच्यावेळी तपासण्यात आले, असे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे. मात्र या क्षेपणास्त्राच्या तांत्रिक बाबींचा कोणताही तपशील पाक लष्कराने उपलब्ध करून दिलेला नाही.
राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शाहबाज शरीफ, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा आणि सेवा प्रमुखांनी या कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले. मे महिन्यात, पाकिस्तानने ४०० किलोमीटरच्या पल्ल्याच्या फतेह-२ गाईडेड रॉकेट प्रणालीचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.





