Pakistan : पाकिस्तान कडून अफगाणिस्तानमधील दौरुगोळ्याचे गोदाम उद्ध्वस्त
पाकिस्तानी सैन्याने खोस्तमधील एक दारूगोळा डेपो उद्ध्वस्त केला. पाक-अफगाण सीमेजवळच्या या डेपोची माहिती मिळताच ही कारवाई केली गेली.

Pakistan – पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधील दारुगोळ्याचे गोदाम नष्ट केल्याचा दावा केला आहे. सोमवारी यासंदर्भातले वृत्त स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केले. अफगाण तालिबानविरोधात पाकिस्तानने सुरू केलेल्या गझब-लिल-हक या ऑपरेशनअंतर्गत ही मोठी कारवाई केल्याचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी सांगितले.
पाकिस्तानी सैन्याने खोस्तमधील एक दारूगोळा डेपो उद्ध्वस्त केला. पाक-अफगाण सीमेजवळच्या या डेपोची माहिती मिळताच ही कारवाई केली गेली.
दरम्यान पाकिस्तानने बागराम हवाई तळाजवळ आपल्या कारवाईची व्याप्ती वाढवली असल्याचे अफगाणिस्तानमधील सूत्रांनी म्हटले आहे. परंतु पाकिस्तानकडून या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
दरम्यान तालिबानविरोधात पाकिस्तानकडून सुरू झालेल्या कारवाईनंतर संघर्ष थांबण्याची कोणतीही लक्षणे सद्या तरी दिसत नाहीत. कतार आणि सौदी अरेबियाकडून दोन्ही देशांमधील संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्याप त्या प्रयत्नांना यश मिळालेले नाही.






