Misbah-ul-Haq : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ ! मिसबाह उल हकचा तडकाफडकी राजीनामा
इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात अक्षरशः भूकंप झाला असून माजी कर्णधार मिसबाह उल हक (Misbah-ul-Haq) यांनी निवड समिती सदस्यपदाचा अचानक राजीनामा दिला आहे.

Misbah-ul-Haq : पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत वाद, नाट्यमय घडामोडी आणि अनपेक्षित निर्णयांची मालिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात अक्षरशः भूकंप झाला असून माजी कर्णधार मिसबाह उल हक (Misbah-ul-Haq) यांनी निवड समिती सदस्यपदाचा अचानक राजीनामा दिला आहे.
इंग्लंडमधील हेडिंग्ले आणि लॉर्ड्स कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. मोहम्मद अब्बास, सौद शकील आणि अब्दुल्ला शफीक या मोजक्या खेळाडूंचा अपवाद वगळता उर्वरित खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी करण्यात सपशेल अपयशी ठरले.
या नामुष्कीनंतर संतापलेल्या बोर्डाने कठोर पावले उचलत चालू दौऱ्यातून तब्बल ७ खेळाडूंना थेट मायदेशी परत पाठवले असून त्यांच्या जागी पाच नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली आहे.
या पराभवाची मोठी किंमत संघ व्यवस्थापनालाही (Misbah-ul-Haq) चुकवावी लागली आहे. मुख्य प्रशिक्षक सर्फराझ अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांची पदावरून तातडीने हकालपट्टी करण्यात आली असून, वनडे व टी२० संघाचे प्रशिक्षक माईक हेसन आणि ॲशले नॉफक यांच्याकडे आता कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, मिसबाहने (Misbah-ul-Haq) लाहोरमधील नॅशनल क्रिकेट अकादमीच्या फलंदाजी सल्लागार पदाचाही राजीनामा दिला आहे, मात्र बोर्डाने अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. २०१७ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर पीसीबीमध्ये मुख्य प्रशिक्षक, निवड समिती प्रमुख आणि विविध सल्लागार भूमिका सांभाळणाऱ्या मिसबाहच्या या तडकाफडकी निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेटमधील अनागोंदी पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.






