पाक निवड समितीच्या अध्यक्षपदी शोएब अख्तर?

लाहोर – मिसबाह उल हक याच्या कणाहिन कामगिरीमुळे संतापलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाने निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्याकडे सोपविली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पाकिस्तान मंडळाने मिसबाहकडे संघाचे मुख्य प्रशिक्षकपद तसेच निवड समितीच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपवली होती. मात्र, नुकत्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत सुमार झाल्याने मिसबाहच्या भूमिकेवरच शंका घेतली जाऊ लागली आहे. अख्तरनेही या वृत्ताला दुजोरा
दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.