Joe Root Record : जो रूटचा मोठा धमाका! सचिन तेंडुलकरच्या ‘या’ वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी; पाँटिंगचा विक्रम थोडक्यात हुकला
Joe Root Record : मायदेशात सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडण्यासाठी रूटला अवघ्या तीन धावांची गरज आहे.

Joe Root Equals Sachin Tendulkar Most Test Fifties World Record : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात हेडिंग्ले मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (Joe Root) ६६ धावांची संयमी आणि शानदार अर्धशतकी खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) जागतिक विक्रमाशी बरोबरी केली आहे. इतकेच नाही तर मायदेशात सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडण्यासाठी रूटला अवघ्या तीन धावांची गरज होती, जी संधी आता त्याला दुसऱ्या डावात मिळणार आहे.
सचिनच्या ६८ अर्धशतकांशी बरोबरी; नवा इतिहास रचण्यापासून १ पाऊल दूर –
बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर पुन्हा एकदा कसोटी कर्णधारपद सांभाळणाऱ्या जो रूटने पाकिस्तानविरुद्ध ११२ चेंडूंत १० चौकारांसह ६६ धावा कुटल्या. रूटच्या कसोटी कारकिर्दीतील १६७ व्या सामन्याच्या ३०५ व्या डावातील हे ६८ वे कसोटी अर्धशतक ठरले. सचिन तेंडुलकरने आपल्या २०० कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ६८ अर्धशतके झळकावली होती. आता रूटला सचिनला मागे टाकून कसोटीत सर्वाधिक अर्धशतके ठोकणारा जगातील नंबर १ फलंदाज बनण्यासाठी अवघ्या एका अर्धशतकाची गरज आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारे दिग्गज:
Sachin Tendulkar and Joe Root at the top! 👑
Two legends now share the record for the most 50+ scores in Test cricket. A truly elite club! 🏏🔥#SachinTendulkar #JoeRoot #TestCricket #SKC #Sportskeeda pic.twitter.com/bO5k3h3vLy
— Sportskeeda (@Sportskeeda) August 20, 2026
- सचिन तेंडुलकर (भारत): ६८ अर्धशतके
- जो रूट (इंग्लंड): ६८ अर्धशतके
- शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज): ६६ अर्धशतके
- ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया): ६३ अर्धशतके
- राहुल द्रविड (भारत): ६२ अर्धशतके
क्लाइव्ह लॉईडला टाकले मागे; कर्णधार म्हणून ‘टॉप-५’ मध्ये एन्ट्री!
Pure class in Leeds! 🏏🔥#Joe_Root delivers a masterclass with a gritty 66 off 112 balls against #Pakistan in the 1st Test. With his 68th Test fifty, he officially equals #Sachin Tendulkar’s record—surpassing legends #Rahul_Dravid, #Allan_Border , and #Shivnarine_Chanderpaul .… pic.twitter.com/skuxWXRZZ7
— Ali Faizan (@aliyfaizan) August 20, 2026
कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक वेळा पन्नासहून अधिक धावा (५०+ स्कोर) करण्याच्या बाबतीत जो रूटने वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांना मागे टाकले आहे. रूटची कर्णधार म्हणून ही ४२ वी फिफ्टी-प्लस खेळी ठरली, ज्यामुळे त्याने थेट ‘टॉप-५’ कर्णधारांच्या एलिट क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रीम स्मिथ (६१), रिकी पॉन्टिंग (५४), ॲलन बॉर्डर (५१) आणि मिस्बाह उल हक (४३) अनुक्रमे पहिल्या चार स्थानांवर आहेत.





