Pakistan Squad : आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर! बाबर-रिझवानला दिला डच्चू

Pakistan Squad Announce for Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबर 2025 पासून सुरुवात होत आहे. यंदा टी-20 स्वरूपातील बहुराष्ट्रीय स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या संघात स्टार खेळाडू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना स्थान देण्यात आलेले नाही. यंदाच्या आशिया कपमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व सलमान अली आगा करणार आहे.
नव्या खेळाडूंवर विश्वास, अनुभवी खेळाडूंचीही साथ –
पाकिस्तानच्या निवड समितीने या स्पर्धेसाठी नव्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. हसन नवाझ, सलमान मिर्झा आणि सुफियान मुकीम यांसारख्या युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. हसन नवाझने नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत प्रभावी कामगिरी केली होती. त्याचबरोबर शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, फखर झमान आणि खुशदिल शाह यांसारख्या अनुभवी खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे. मोहम्मद हारिसला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संघात सामील करण्यात आले आहे.
ट्राय-सीरिज आणि आशिया कपमधील आव्हाने –
🚨 BABAR AZAM AND MOHAMMED RIZWAN DROPPED FROM PAKISTAN’S ASIA CUP SQUAD. 🚨 pic.twitter.com/92S416SsNG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 17, 2025
आशिया कपपूर्वी पाकिस्तान 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये तिरंगी मालिका खेळणार आहे. या मालिकेत पाकिस्तानसह अफगाणिस्तान आणि यूएई संघ सहभागी होणार आहेत. या तिरंगी मालिकेतही पाकिस्तान हाच संघ खेळवणार आहे. आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तान आपल्या मोहिमेची सुरुवात 12 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्धच्या सामन्याने करेल. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी भारताविरुद्धचा बहुप्रतिक्षित सामना होणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 17 सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा सामना यूएईशी होईल. हे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
हेही वाचा – MS Dhoni and Gautami Gambhir : सोहळ्याला अनेकांनी लावली हजेरी; पण चर्चा मात्र धोनी अन् गंभीरचीच…! कारण काय?
आशिया कप 2025 साठी पाकिस्तानचा संघ:
सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर झमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाझ, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम, सॅम अयुब, सलमान मिर्झा.





