MS Dhoni and Gautami Gambhir : सोहळ्याला अनेकांनी लावली हजेरी; पण चर्चा मात्र धोनी अन् गंभीरचीच…! कारण काय?

MS Dhoni and Gautami Gambhir : भारतीय क्रिकेटविश्वात महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. गौतम गंभीर याचे काही जुनी विधानं धोनीला विरोध करणारी असल्याचं बोललं जातं. सोशल मीडियावर देखील या गोष्टीला घेऊन चर्चा झडू लागतात. पण आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला असून, हा फोटो पाहून क्रिकेटप्रेमींना धक्काच बसला आहे. याचं कारण म्हणजे हा एकत्रित फोटो आहे एमएस धोनी आणि गौतम गंभीरचा.
सोशल मीडियावर या दोघांचा व्हायरल झालेला फोटो गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांचा (हर्ष संघवी ब्रदर वेडिंग) यांचे भाऊ उत्कर्ष संघवी यांच्या लग्नातला आहे. या दोघांनीही या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटी आणि भारतीय क्रिकेटमधील अनेक खेळाडू उपस्थित होते. परंतु, एमएस धोनी आणि गौतम गंभीर यांनी सर्वाधिक लक्ष वेधले.
गौतम गंभीर हा त्याच्या स्पष्टव्यक्ते स्वभावामुळे ओळखला जातो. 2007 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामना आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामनासाठी गौतम गंभीरला जितके श्रेय मिळायला हवे तितके दिले जात नाही. तसेच त्याचे काही जुने व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये त्याने धोनीने एकट्याने दोन्ही विश्वचषकांमध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिले नाही, असं म्हटलाचं दिसतं.
..पण चर्चा मात्र धोनी अन् गंभीरचीच..!
सोशल मीडियावर या दोघांच्या एकत्रित फोटोने खळबळ उडवून दिली आहे. या लग्न समारंभात रोहित शर्मा हरभजन सिंग, इरफान पठाण, पार्थिव पटेल आणि तिलक वर्मा या खेळाडूंनी देखील हजेरी लावली होती. पण चर्चा धोनी आणि गंभीरचीच जास्त होताना पाहायला मिळत आहे. याशिवाय या लग्न सोहळ्याला बॅालिवूड इंडस्ट्रीमधूनही काही कलाकार उपस्थित होते. यामध्ये सुनील शेट्टी, कृती सॅनन आणि वरुण शर्मा दिसले.
हेही वाचा : अमेरिकन ट्रेड डील टीमचा भारत दौरा रद्द, अमेरिका-भारताचा व्यापार करार पुन्हा अडचणीत





