Pakistan : पाकिस्तानात ऑगस्ट महिन्यात ५९ दहशतवादी हल्ले
Updated On:

Pakistan – पाकिस्तानात ऑगस्ट २०२४ या एकाच महिन्यात तब्बल ५९ दहशतवादी हल्ले झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ८४ जण ठार झाले आहेत. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात असाच हल्ल्यांमध्ये ३८ जण ठार झाले होते.
ऑगस्ट महिन्यातल्या हल्ल्यातील मृतांची संख्या जोडून पाकिस्तानात वर्षभरात अशा हल्ल्यांमध्ये तब्बल ३२५ जण ठार झाले आहेत, असे पाक इन्स्टिट्युट फॉर पीस स्टडीज या थिंक टँकने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.
ऑग्सट महिन्यात खैबर पख्तुनख्वा प्रांतात २९, बलुचिस्तानमध्ये २८ पंजाबमध्ये २ दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये ८४ जण ठार आणि १६६ जण जखमी झाले.
तसेच २००६ पासून आतापर्यंत १७,८४६ दहशतवादी घटना घडल्या असून त्यात २४,३७३ लोक मारले गेले आहेत आणि ४८,०८५ लोक जखमी झाले आहेत.





