PAK VS SA 1st T20 : द. आफ्रिकेविरूध्दच्या पहिल्याच टी-20 मध्ये पाकचा लाजिरवाणा पराभव, बाबर आजम पुन्हा ठरला फेल…..

PAK VS SA 1st T20 Highlights : मोहम्मद रिझवानच्या शानदार फलंदाजीनंतरही पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 13 डिसेंबरला होणार आहे.
डर्बनमधील किंग्समीड येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 विकेट गमावून 183 धावा केल्या आणि पाकिस्तानला 184 धावांचे लक्ष्य दिले होते.
South Africa win the first T20I by 11 runs.
We look to bounce back in the next match on Friday 🏏#SAvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/YTe8sVjLQo
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 10, 2024
आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने स्फोटक खेळी खेळून संघाची धुरा सांभाळली. त्याने 40 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 82 धावा केल्या. याव्यतिरिक्त जॉर्ज लिंडेने 24 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदी आणि अबरार अहमद यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. त्यांच्याशिवाय अब्बास आफ्रिदीने 2 आणि सुफियान मुकीमने 1 बळी घेतला.
विजयासाठी 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातही खास नव्हती. बाबर आझम तिसऱ्याच षटकात क्वेना माफाकाचा बळी ठरला. बाबरला खातेही उघडता आले नाही. यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सैम अयुब यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी झाली. 7व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अयुब झेलबाद झाला. त्याने 15 चेंडूत 31 धावा केल्या.
उस्मान ख्वाजा 75 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 8 चेंडूंचा सामना करत 9 धावा केल्या. तय्यब ताहिरने 18 चेंडूत 18 धावांची खेळी केली. त्यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने 9, इरफान खानने 1 धावा केल्या. अब्बास आफ्रिदी गोल्डन डकचा बळी ठरला. कर्णधार मोहम्मद रिझवानने 62 चेंडूत 74 धावा केल्या.
संघाची धावसंख्या 75 असताना उस्मान खान पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 8 चेंडूंचा सामना करत 9 धावा केल्या. तय्यब ताहिरने 18 चेंडूत 18 धावांची खेळी केली. त्यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने 9, इरफान खानने 1 धावा केल्या. अब्बास आफ्रिदी गोल्डन डकचा बळी ठरला. मोहम्मद रिझवानने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने 62 चेंडूत 5 चौकार अन् 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या पण तो संघास विजय मिळवू देऊ शकला नाही आणि पाकिस्तान संघ निर्धारित षटकात 8 गडी गमावून केवळ 172 धावांच करू शकला. पाकिस्तानच्या 7 खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत जॉर्ज लिंडेने शानदार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकात 21 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. याव्यतिरिक्त कविना मफाका याने 2 तर ओटनील बार्टमैन आणि एंडिले सेमिल्ने यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.





