PAK vs SA : बॉक्सिंग डे कसोटीसाठी पाकची प्लेइंग-11ची घोषणा, ‘या’ अनुभवी खेळाडूचे 3 वर्षांनंतर संघात पुनरागमन….

PAK vs SA 1st Test : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबर रोजी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना सेंच्युरियनमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने आधीच संघ जाहीर केला आहे. यानंतर आता पाकिस्तानने सुध्दा आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. बाबर आझमचे संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली नव्हती.
‘या’ खेळाडूंना मिळाली संधी….
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पाकिस्तानचे नेतृत्व शान मसूद करत आहे. बाबर आझमचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. याशिवाय नसीम शाहसुध्दा प्लेइंग 11 चा भाग आहे. मोहम्मद अब्बासला तीन वर्षांनंतर संघात संधी मिळाली आहे. सलामीवीर अब्दुल्ला शफीकचे नाव प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. या सामन्यात सलामीचा फलंदाज म्हणून शान मसूद दिसणार आहे. तर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
दक्षिण आफ्रिकेत केली आहे चांगली कामगिरी..
दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिका जिंकली होती. पण पाकिस्तानने वनडे मालिकेत पुनरागमन केले. यादरम्यान त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा पराभव केला होता. संघाकडून चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून अशाच कामगिरीची अपेक्षा होती. सर्वांच्या नजरा बाबरवर खिळल्या आहेत कारण त्याला त्याच्या टीकाकारांना उत्तर देण्याची संधी आहे.
🚨 Pakistan’s playing XI for the first Test against South Africa in Centurion 🇵🇰#SAvPAK pic.twitter.com/8BdXEPAMfh
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 25, 2024
पहिल्या कसोटीसाठी पाकचा संघ खालीलप्रमाणे…..
शान मसूद (कर्णधार), सॅम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील (उपकर्णधार), सलमान अली आगा, आमिर जमाल, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास.\
Border-Gavaskar Trophy 2024/25 : बुमराहला भिडणारा सर्वोत्तम फलंदाज म्हणजे ट्रॅव्हिस हेड – ग्रेग चॅपल
दक्षिण आफ्रिकेचे प्लेइंग इलेव्हन…
टोनी डीजॉर्ज, एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॉन्सन, कागिसो रबाडा, डेन पॅटरसन, कॉर्बिन बॉश.





