PAK vs NZ 1st T20 : सामना हरल्यानंतरही ‘बाबर आझम’च्या नावावर झाली एका विक्रमाची नोंद

PAK vs NZ 1st T20 : पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी न्यूझीलंडच्या ईडन पार्कवर खेळला गेला. जिथे पाकिस्तान संघाला न्यूझीलंडकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
किवी संघाने हा सामना 46 धावांनी जिंकला. या सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तान संघ या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडला आहे. मात्र, या सामन्यात संघाचा माजी कर्णधार बाबर आझमने शानदार फलंदाजी करत एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
बाबर आझमची दमदार खेळी…
सर्वात जास्त T20I धावा करणाऱ्या खेळाडूंच्या विशेष यादीत बाबरने मार्टिन गप्टिलला मागे टाकले आणि आता फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा ही भारतीय जोडी त्याच्या पुढे आहे. बाबर आता या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. बाबर आझमने 105 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 3 हजार 542 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी
विराट कोहली (भारत) – 115 सामन्यात 4008 धावा
रोहित शर्मा (भारत) – 149 सामन्यात 3853 धावा
बाबर आझम (पाकिस्तान) – 105 सामन्यात 3542 धावा
मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) – 122 सामन्यात 3531 धावा
पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) – 134 सामन्यात 3428 धावा





