Australia vs Pakistan T20 Series : मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तान संघाची कामगिरी कांगारू संघापेक्षा सर्वच बाबतीत सरस होती आणि रिझवानचे नेतृत्व उत्कृष्ट होते आणि त्याचा परिणाम पाकिस्तानच्या विजयाच्या रूपात समोर झाला. या शानदार विजयासह रिझवानचा कर्णधार म्हणून प्रवासाची सुरूवातही शानदार झाली.
एकदिवसीय मालिकेत विजयाची नोंद केल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट संघ आता कांगारू संघाविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही तीन सामन्यांची टी-20 मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. उभय संघांमधील दुसरा सामना 16 नोव्हेंबर रोजी सिडनी येथे तर या मालिकेतील शेवटचा सामना 18 नोव्हेंबर रोजी होबार्ट येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार हे सर्व सामने दुपारी 1.30 वाजता सुरू होतील.
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया हेड टू हेड
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सामन्यातील हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांमधील विजय-पराजयाचा फरक फार मोठा दिसत नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 25 टी-20 सामने खेळले गेले आहेत ज्यात पाकिस्तानने 13 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 11 सामने जिंकले आहेत, तर एक सामना निकालाशिवाय संपला आहे. या दोन्ही संघांमधील विजय-पराजयाचा फरक फार मोठा नाही, पण विजयाच्या बाबतीत पाकिस्तानचा संघ कांगारूंच्या पुढे आहे.
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया T20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना- 14 नोव्हेंबर- ब्रिस्बेन (भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता)
दुसरा सामना – 16 नोव्हेंबर – सिडनी (भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता)
तिसरा सामना- 18 नोव्हेंबर, होबार्ट (भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता)
टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ : मोहम्मद रिजवान (कर्णधार), अब्बास अफरीदी, आगा सलमान, अराफात मिन्हास, बाबर आजम, हारिस रऊफ, हसीबुल्लाह खान, इरफान खान, जहांदाद खान, नसीम शाह, ओमैर यूसुफ, साहिबजादा फरहान, शाहीन शाह अफरीदी, सुफियान मुकीम, उस्मान खान.
टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ : जोश इंगलिस (कर्णधार), सीन एबॉट, जेवियर बार्टलेट, टिम डेविड, नाथन एलिस, जेक फ्रेजर-मैकगर्क, आरोन हार्डी, स्पेंसर जॉनसन, ग्लेन मैक्सवेल, जोश फिलिप, मैथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, एडम जंपा.
पाकनं 22 वर्षांनंतर केली ‘अशी’ कामगिरी
दरम्यान, तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला होता. यासह पाकिस्तानने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली होती. विशेष म्हणजे पाकिस्तानने 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती.