Pune News : मेळघाटातील ४० वर्षांच्या सेवाव्रताचा पुण्यात गौरव; पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे दांपत्याला ‘कर्मयोगी सन्मान’
Pune News : मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागात गेली चार दशके आरोग्यसेवा, कुपोषणाविरोधातील लढा आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य समर्पित करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे दांपत्याचा पुण्यातील नांदेड सिटी येथे भव्य गौरव करण्यात येणार आहे.

Pune News : मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागात गेली चार दशके आरोग्यसेवा, कुपोषणाविरोधातील लढा आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य समर्पित करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे दांपत्याचा पुण्यातील नांदेड सिटी येथे ‘रामराज्य ज्येष्ठ नागरिक कर्मयोगी सन्मान’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. (Pune News)
कै. निवृत्ती हगवणे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शनिवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता ॲम्फिथिएटर, नांदेड सिटी येथे हा कार्यक्रम होणार आहे. (Pune News)
यावेळी डाॅ. कोल्हे दांपत्याची मुलाखत मृणालिनी चितळे त्यांच्याशी संवाद साधणार असून, मेळघाटातील चार दशकांचा सेवाप्रवास, आरोग्यसेवेतील आव्हाने आणि सामाजिक परिवर्तनामागील प्रेरणा यांचा उलगडा होणार आहे. (Pune News)
डॉ. रवींद्र कोल्हे यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेळघाटातील दुर्गम आदिवासी भागात अत्यल्प शुल्कात वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच बालकुपोषण, आरोग्यविषयक जनजागृती आणि शेतीविषयक प्रयोगांद्वारे आदिवासी समाजाच्या जीवनमानात बदल घडविण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. डॉ. स्मिता कोल्हे यांनीही आदिवासी महिला व बालकांचे आरोग्य, बालसंगोपन, सामाजिक प्रश्न आणि कायदेशीर हक्कांसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. (Pune News)
पद्मश्री गिरीश प्रभुणे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित राहणार असून मगरपट्टा व नांदेड सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर आणि माजी विशेष पोलिस महासंचालक सुरेश खोपडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. ज्येष्ठांच्या कार्याचा गौरव, निःस्वार्थ समाजसेवेचा आदर्श आणि नव्या पिढीमध्ये सेवाभावाची प्रेरणा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. (Pune News)





