Pune News : विसर्जनामागे दडला निसर्ग आणि संस्कारांचा संदेश
Pune News : गणेशमूर्तीची स्थापना, नऊ-दहा दिवसांची पूजा आणि त्यानंतर होणारे भावूक विसर्जन या संपूर्ण परंपरेमागे केवळ धार्मिक विधी नसून मन, समाज आणि निसर्गाशी जोडणारा एक अत्यंत मोठा संदेश दडलेला आहे.

Pune News : गणेशमूर्तीची स्थापना, पूजा आणि विसर्जन या परंपरेमागे केवळ धार्मिक विधी नसून मन, समाज आणि निसर्गाशी जोडणारा संदेश आहे. नैसर्गिक मातीपासून साकारलेली मूर्ती भक्तीचे केंद्र बनते आणि विसर्जनावेळी पुन्हा निसर्गात विलीन होते. (Pune News)
‘मूर्ती जाते; मात्र बुद्धी, विवेक आणि संस्कार मनात कायम राहतात,’ असा या परंपरेचा व्यापक अर्थ आध्यात्मिक संशोधक व ध्यानगुरू रघुनाथ गुरुजी यांनी सांगितला. (Pune News)
गणेशपूजेमुळे बुद्धीचा विकास
गणपतीला बुद्धी, विवेक आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. मंत्रजप, आरती, ध्यान आणि सामूहिक प्रार्थनेमुळे मन शांत होऊन एकाग्रता, शिस्त आणि कृतज्ञता वाढते. उत्सवामुळे कुटुंब आणि समाजातील एकोपा मजबूत होतो. (Pune News)
भाद्रपदातच गणेशोत्सव का?
पावसाळ्याच्या उत्तरार्धात जमीन सुपीक आणि जलस्रोत समृद्ध असतात. स्थानिक माती सहज उपलब्ध असल्याने मातीपासून मूर्ती घडविण्याच्या परंपरेला निसर्गाशी जोडलेला अर्थ आहे. पृथ्वी आणि जल या पंचमहाभूतांचा सन्मान करण्याचा तो प्रतीकात्मक मार्ग मानला जातो. (Pune News)
विसर्जन म्हणजे देव नष्ट करणे नव्हे!
गणेशमूर्तीचे साकार रूप विसर्जनातून पुन्हा निसर्गात विलीन होते. ‘आसक्ती सोडा, निसर्गाला परत द्या आणि चांगले गुण जीवनात धारण करा,’ असा त्यामागील संदेश आहे. पूर्वीच्या मातीच्या मूर्ती विसर्जनानंतर पुन्हा मातीमध्ये मिसळत असत. त्यामुळे आजही शाडूमाती आणि नैसर्गिक रंगांच्या मूर्तींचा आग्रह पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. (Pune News)
इतर देवतांच्या मूर्तींचेही विसर्जन
विसर्जन केवळ गणेशमूर्तीपुरते मर्यादित नाही. उत्सवासाठी तयार केलेल्या पार्थिव मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे दुर्गा, काली, सरस्वती आदी देवतांच्या उत्सवी मूर्तींचेही विसर्जन करण्याची परंपरा आहे. मात्र दगड किंवा धातूच्या कायमस्वरूपी मूर्तींचे विसर्जन केले जात नाही. (Pune News)
Pune News : लोणंदमध्ये आर.के. फिजिओथेरपी आणि पॅरालिसिस केअर सेंटरचे उद्घाटन
Pune News : ४० हून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोंटींची फसवणूक; न्यायालयाने फेटाळला जामीन


