पी. चिदंबरम यांच्याविरोधातील कारवाईला स्थगिती

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या एअरसेल-मॅक्सिस प्रकरणातील ट्रायल कोर्टाच्या कारवाईला दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. तसेच उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस देखील बजावली आहे.
एअरसेल-मॅक्सिस प्रकरणातील ट्रायल कोर्टाने दिलेल्या आदेशाला आव्हान देत चिदंबरम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर न्या. मनोज कुमार आहेरी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने २२ जानेवारी २०२५ रोजीपर्यत ईडीला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात ट्रायल कोर्टाने 27 नोव्हेंबर 2021 रोजी चिदंबरम आणि कार्ती यांच्याविरुद्ध सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रांची दखल घेतली आणि त्यांना नंतरच्या तारखेला समन्स बजावले होते.





