Ozar News : श्रीक्षेत्र ओझर येथे तिसरे पश्चिमद्वार उत्साहात; शिरोली खुर्द येथे रती-कंदर्प पूजा
Ozar News : भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त अष्टविनायकांपैकी प्रमुख स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर गणपतीचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.

Ozar News : भाद्रपद चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांपैकी प्रमुख स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतींचा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू आहे. जन्मोत्सवाच्या द्वार यात्रेतील तिसरे पश्चिमद्वार शिरोली खुर्द येथे आज उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. (Ozar News)
गणेश जयंती उत्सवानिमित्त श्री विघ्नहर गणपती बाप्पा पालखीतून आपल्या भगिनी तसेच विविध देव-देवतांना श्रींच्या जन्मोत्सवाचे आमंत्रण देण्यासाठी द्वार यात्रेला जातात. या द्वार यात्रेला प्राचीन धार्मिक परंपरा असून, श्रींच्या जन्मोत्सवातील या यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. (Ozar News)
शिरोली खुर्द येथे तिसरे पश्चिमद्वार
सकाळी ठीक १०.३० वाजता श्रींची पालखी शिरोली खुर्दच्या दिशेने मार्गस्थ झाली. पालखी शिरोली खुर्द येथील मंदिरात दाखल झाल्यानंतर तेथे रती-कंदर्प पूजा विधिवत पार पडली. यावेळी ग्रामस्थ व भाविकांनी भक्तिभावाने श्रींचे दर्शन घेतले. (Ozar News)
रती-कंदर्प पूजा संपन्न झाल्यानंतर शिरोली खुर्द ग्रामस्थांच्या वतीने श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कवडे तसेच विश्वस्त मंडळाचा सत्कार करण्यात आला. (Ozar News)
यानंतर श्रींची पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. पालखीबरोबर मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. विविध ठिकाणी ग्रामस्थ व भाविकांकडून पालखीचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. (Ozar News)
या द्वार यात्रेत अनेक भाविक श्रद्धेने अनवाणी चालत पालखीबरोबर सहभागी झाले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला होता. (Ozar News)
दिवसभराच्या प्रवासानंतर सायंकाळी ठीक ५ वाजता श्रींच्या पालखीचे श्री विघ्नहर मंदिरात आगमन झाले. पालखी मंदिरात दाखल होताच भाविकांनी जयघोष करत श्रींचे दर्शन घेतले आणि तिसऱ्या पश्चिमद्वाराची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. (Ozar News)
या द्वार यात्रेत देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त, कर्मचारी, भाविक तसेच शिरोली खुर्द व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण यात्रेदरम्यान भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ‘गणपती बाप्पा मोरया, श्री विघ्नहर महाराज की जय’ अशा जयघोषाने श्रीक्षेत्र ओझर परिसर दुमदुमून गेला. (Ozar News)
Ozar News : श्रीक्षेत्र ओझर येथे पहिल्याच दिवशी दोन द्वार यात्रा उत्साहात; हजारो भाविकांचा सहभाग






