The Hundred Mens Final 2024 : ओवल इनविंसिबल्सने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पटकावले ‘द हंड्रेड’चे विजेतेपद…

The Hundred Mens Final 2024 (Oval Invincibles vs Southern Brave) : ओवल इनविंसिबल्सने सलग दुसऱ्यांदा ‘द हंड्रेड मेन्स’ (द हंड्रेड मेन्स 2024) हे विजेतेपद जिंकून इतिहास रचला. अंतिम फेरीत ओवल इनविंसिबल्स संघाने साउदर्न ब्रेवचा 17 धावांनी पराभव केला. या विजयासह, ओवल इनविंसिबल्स हा पुरुषांच्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा पहिला संघ ठरला. 2023 मध्येही संघाने बाजी मारली होती.
कसा झाला सामना?
लॉर्ड्स, लंडन येथे खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात साउदर्न ब्रेव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंंतर प्रथम फलंदाजी करताना ओवल इनविंसिबल्स संघाने 100 चेंडूत 9 बाद 147 धावा केल्या. संघासाठी सलामी देणाऱ्या विल जॅकने सर्वात मोठी खेळी खेळली आणि 22 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. यादरम्यान गोलंदाजीत टायमल मिल्सने साउदर्न ब्रेवकडून सर्वाधिक 3 बळी घेतले.
Defence! 🛡️🏆#TheHundred pic.twitter.com/xR592W45br
— The Hundred (@thehundred) August 18, 2024
साउदर्न ब्रेवची फलंदाज ठरले फेल…
विजयासाठी 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या साउदर्न ब्रेव संघाची निराशाजनक कामगिरी झाली. प्रत्युत्तरात, साउदर्न ब्रेवला 100 चेंडूत 7 बाद केवळ 130 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर ॲलेक्स डेव्हिसने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 23 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. मात्र, संघाच्या एकूण चार फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. या कमकुवत फलंदाजीमुळे साउदर्न ब्रेवला विजेतेपदाचा सामना गमवावा लागला. यासह साउदर्न ब्रेवने दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी गमावली आहे.
ओवल इनविंसिबल्सच्या गोलंदाजाची चमकदार कामगिरी …
लक्ष्याचा पाठलाग करताना साउदर्न ब्रेवच्या फलंदाजांना ओवल इनविंसिबल्स संघाच्या गोलंदाजांविरूध्द धावा काढण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. ओवल इनविंसिबल्स संघाकडून साकिब महमूदने सर्वाधिक 3 बळी घेतले. यादरम्यान शाकिबने 20 चेंडूत केवळ 17 धावा दिल्या तर ॲडम झाम्पाने 2 विकेट्स घेतल्या. उर्वरित 1-1 असे यश विल जॅक आणि नॅथन साउटर यांना मिळाले.





