पाबळ येथील घटना
शिक्रापूर- पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी येथील काळूबाई देवीच्या खासगी मंदिरातून देवीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची व मुकुटाची चोरी झाली. याप्रकरणी प्रकाश बबन बगाटे (रा. पिंपळवाडी) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे.
येथील पिंपळवाडी येथे प्रकाश बगाटे यांनी त्यांच्या बंगल्याच्या परिसरामध्ये काळूबाई मंदिर बांधले आहे. देवीच्या मूर्तीवर बगाटे यांनी 2016 साली चांदीचा मुकुट, अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र घातले होते. दि. 22 रोजी बगाटे हे देवीच्या मंदिरातून पूजा करून दरवाजा बंद करून कामानिमित्ताने बाहेर गेले होते. त्यांनतर रात्री आठच्या सुमारास बगाटे हे मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे करीत आहेत.