श्री उवसग्गहरं स्तोत्राच्या सामूहिक पठणाचे आयोजन

पुणे – रसिकलाल एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता श्री उवसग्गहरं स्तोत्राच्या सामूहिक पठणाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचे हे नववे वर्ष आहे.
श्री उवसग्गहरं स्तोत्राच्या नियमित स्मरणामुळे दृष्टग्रह, रोगपिडा, शत्रु आदि सांसारिक दुःखपिडा दुर होतात. तसेच मनुष्य प्राणीमात्रामधे सुख समृद्धी प्राप्त होते, अशी धारणा आहे, याच अनुषंगाने जैन धर्मियांमध्ये महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या श्री. उवसग्गहरं स्तोत्राच्या सामूहिक पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी रसिकलाल एम. धारीवाल फाउंडेशनतर्फे केले जाते.
सध्या अशा उपक्रमांची गरज आहे ज्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते. पहिला कार्यक्रम २०१७ मध्ये रसिकलाल धारीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संत आणि साध्वी म . सा . यांच्या सानिध्यात झाला होता . यावर्षी ,आर.एम. धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन आणि उपाध्यक्षा शोभा रसिकलाल धारीवाल यांच्यातर्फे १७ ऑगस्ट रोजी हा उपक्रम आयोजित केला आहे.
आचार्य पद्मश्री चंदनाजी म . सा . , पू .श्री मुकेश मुनिश्री म . सा . आणि पू . श्री जयप्रभा विजयजी गुरुदेव म . सा . , पू .श्री आगमचंद्रजी स्वामी म . सा . यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम बिबवेवाडी येथील श्रीमान रसिकलालजी एम धारीवाल स्थानक भवन, यश लॉन्स येथे होणार आहे.
कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून सहभागी पुरुषांनी शुभ्र तर महिलांनी केशरी अथवा पिवळे वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच कार्यक्रमानंतर लगेच चौविहारची (जेवण) सुद्धा व्यवस्था केल्याची माहिती फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा रसिकलाल धारिवाल यांनी दिली.




