दादरच्या कबूतरखाना परिसरात आंदोलन; जैन समाज आक्रमक; पोलिसांसोबत जोरदार झटापटी
Kabutar Khana Dadar | मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या दादरच्या कबुतरखान्यावरील बंदीवरून वाद पेटला आहे. यातच आता जैन समाज मोठ्या संख्येने कबूतरखाना परिसरात पोहोचला आहे. यावेळी कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन समाजाकडून काढण्यात आली. अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्री काढली. तसेच कबुतरखान्यावर बांधण्यात आलेले बांबू देखील महिलांकडून हटवण्यात आले. यावेळी जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पोलिसांकडून आंदोलकांना थांबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भागात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सध्या दादरमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे बघायला मिळतं आहे. या घटनेनंतर जैन समाजाच्या भावना या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. Kabutar Khana Dadar |
जैन समुदायाचा जमाव आक्रमक
आज दादर कबुतरखान्याच्या परिसरात जैन समाजाकडून प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सकाळीच काही जैन बांधवांनी आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करु, कुठलीही जबरदस्ती करुन ताडपत्री हटवणार नाही, असे म्हटले होते. मात्र, पालिकेने कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यापूर्वीच जैन समुदायाचा जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून काढून टाकली. Kabutar Khana Dadar |
कबूतरांना धान्य टाकणाऱ्यांवर कारवाई
गेल्या अनेक महिन्यांपासून दादरमधील कबुतरखाना हटवण्याची मागणी होत आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेकडून हा कबूतरखाना बंद करण्यात आला. मात्र, कबूतरखाना बंद केल्यानंतरही मनाई असताना लोक कबूतरांना धान्य टाकत असल्याचे लक्षात आले. यावर कोर्टाने नाराजी व्यक्त करत कबूतरांना धान्य टाकणाऱ्यांवर सक्त कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.
यानंतर महापालिकेकडून दादरच्या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली. जेणे करून लोक तिथे धान्य टाकू शकणार नाहीत आणि कबूतर तिथे बसणार नाहीत. ताडपत्री टाकल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला. Kabutar Khana Dadar |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेने कंट्रोल फिडिंग करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या होत्या.
हेही वाचा :
शेअर बाजारावर दबाव ; अमेरिकेच्या टॅरिफच्या भीतीने सेन्सेक्स, निफ्टीत घसरण





