Pune : प्राचीन गोडीजी पार्श्वनाथ मंदिरात अभिषेक

पुणे – गुरुवार पेठ येथील ४५० वर्षे जुने प्राचीन श्री गोडीजी पार्श्वनाथ टेम्पल ट्रस्ट येथे चिंतामणी पार्श्वनाथ वद दशम शताब्दी महोत्सवानिमित्त विशिष्ट द्रव्याने अभिषेक करण्यात आला. नयनरम्य दीपक सजावटीत महापूजेचे आयोजन करण्यात आले.
पूजेच्या वस्त्रात जैन बांधव अभिषेकासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पू. आचार्य विराग सागर सुरीश्वरजी म. सा., पू. पंन्यास राजरक्षित विजयजी म.सा., पू पंन्यास नयरक्षित विजयजी, म.सा., पू पंन्यास कृपा बिंदू विजयजी म.सा., आदी उपस्थित होते.
शताब्दी महोत्सवानिमित्त दि. १८ ते २० जूनपर्यंत तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोडीजी मंदिर भव्य रोषणाईने आणि फुलांनी सजवण्यात आले होते. हजारो भाविकांनी मंदिरात उपस्थित रौन वीज कार्यक्रमाचा आनंद घेत गोडीजी पार्श्वनाथ भगवानचे दर्शन घेतले.
गोडीजी पार्श्वनाथ मंदिरातील अभिषेकाचा रत्नागिरीचे दिनेश ओसवाल परिवाराने लाभ घेतला. याप्रसंगी गोडीजी पार्श्वनाथ मंदिरचे अध्यक्ष भूपेंद्र शहा, ट्रस्टी भरत शहा, धीरूभाई शहा, अशोक शहा, सुधीर शहा, राजीव शहा, चिराग दोशी आणि जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.


