Maharashtra Politics : ठाकरेंशी संबंधीत वरूण सरदेसाई यांच्या चौकशीचा आदेश

नागपूर – युवासेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा मावस भाऊ वरुण सरदेसाई यांच्या चौकशीचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ठाकरे परिवाराला लक्ष्य करण्यासाठी जाणिवपुर्वक हे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे.
भाजपचे आमदार योगेश सागर यांनी सभागृहात हा आरोप केला होता. त्याच्या चौकशीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केली. यात काही गरजु युवकांकडून प्रत्येकी 8 ते 10 लाख रूपये घेऊन त्यांना प्रशिक्षणाला पाठवण्यात आले.
Himachal Pradesh : अटल बोगद्याजवळ अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका; 400 हून अधिक…
प्रशिक्षणानंतर त्यांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु त्यांना नोकरी न देता फसवणूक करण्यात आली असा आमदार सागर यांचा आरोप आहे.





