मनसे-भाजप युतीला विरोध? शिवसेनेच्या आमदाराने स्पष्ट केली भूमिका; म्हणाल्या “नुकसान होणार असेल तर…”

Manisha Kayande | आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपा युतीच्या चर्चा सुरु आहेत. अलीकडेच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक काल मुंबईत पार पडली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या ताकदीबाबत पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होऊ शकली नाही, याबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मनसे आणि भाजपची युती होऊ शकली नाही, अशी खंत मनसेच्या नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती आहे.
‘मुंबईत ७ ते ८ जागांवर मनसेमुळे फटका बसला’
यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपा युतीच्या चर्चेवर मनीषा कायंदे यांनी हे भाष्य केले. “गेली १० वर्ष मनसेचा इतिहास पाहिला आणि त्यांच्या अध्यक्षांच्या बदलत्या भूमिका पाहिल्या तर ते अचंबित करणारे आहे. भाजपाशी त्यांनी मैत्री असू दे आम्हाला काही देणेघेणे नाही परंतु आम्हाला मुंबईत ७-८ जागांवर मनसेमुळे फटका बसला. सदा सरवणकरांची सीटिंग जागा पडली. वरळीतही आमचे उमेदवार जिंकले असते. महायुती येऊन घटकपक्षाचे नुकसान होत असेल तर आम्ही कुठल्या मनाने त्यांचं स्वागत करायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे,” असा निशाणा शिंदे सेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर साधला आहे. Manisha Kayande |
जेव्हा महायुतीचं सरकार झाले तेव्हा एकनाथ शिंदे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी सुरू होत्या. विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे चित्र पूर्णपणे वेगळे होते. अद्याप युतीची चर्चा नाही जेव्हा महायुतीत मनसेच्या समावेशाबाबत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे विचारतील तेव्हा आम्ही आमची मते त्यांना सांगू,” असे स्पष्ट मत मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले. तसेच भाजपाचे नेते आशिष शेलार आणि राज ठाकरेंच्या भेटीबाबत त्यांनी ‘भेटी होत असतात पण युतीचा विषय वेगळा आहे त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे,’ असे म्हंटले. Manisha Kayande |
मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केली खंत
दरम्यान, विधानसभा आणि लोकसभेत शिंदेंसोबत युती करण्याच्या मनसेची तयारी असताना आणि भाजपकडून हिरवा कंदीलही मिळाला असताना, शिंदे यांनी मनसेचा युतीचा मार्ग रोखला. विधानसभेत मनसे आणि शिंदे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले, त्यामुळे दोघांनीही काही जागा गमावल्या, पण ठाकरेंना अनेक ठिकाणी याचा फायदा झाला, असे राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सांगितले. मात्र महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा युती करण्याबाबत मनसे पक्ष सकारात्मक असल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला. तर विधानसभेत मनसेनं ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. मात्र आता शिवसेना आणि मनसे यांचे आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाल्यानंतर मनसे – भाजपच्या युतीबाबत कोणता निर्णय घेतला जाणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा:





