Yukran Aattak : भीषण..! रशियाचा युक्रेनमधील न्यूक्लियर प्लांटवर मिसाईल हल्ला; राष्ट्रपती जेलेंस्की यांची माहिती, अनेक नागरिकांचा मृ्त्यू

गेल्या काही वर्षांत रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले करण्यात येत आहे. दोन्ही देशांत अद्यापही कोणत्याही प्रकारची तडजोड झाली नसल्याने हे हल्ले होताना दिसत आहेत. अशा हल्ल्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर युक्रेनमधील स्थानिक रहिवासी मारले गेले आहेत. आता पुन्हा एकदा रशियाने दक्षिण युक्रेनच्या जापोरिज्जिया शहरावर मोठा मिसाईल हल्ला केला आहे. या हल्ल्यात १३ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर ३० नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की यांनी टेलिग्राम चॅनेलवरून या हल्ल्याचे व्हिडिओ पोस्ट केले आहे.
या हल्ल्याबाबात युक्रेनेचे राष्ट्रपती जेलेंस्की आणि क्षेत्रीय गवर्नर इवान फेडोरोव यांनी माहिती दिली आहे. या हल्ल्यात १३ नागरिक मारले गेले आहेत. जापोरिज्जिया येथे मिसाइल आणि ग्याइड बॅाम्बचा वर्षाव सुरू केला. हल्ला होणार असल्याचा इशारा काही मिनिटं अगोदरच देण्यात आला होता. आज या भागात शोक दिवस पाळण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यामुळे आता रशिया आणि युक्रेन या युद्धाला पुर्णविराम कधी लागणार हा प्रश्न आहे. दोन्ही देशांच्या भांडणात नागरिकांचे बळी जात आहे. “सर्वसामान्य नागरिक बळी पडणार हे माहित असतानाही एका शहरावर हवाई बॉम्ब हल्ला करणं, यापेक्षा जास्त काही क्रूर असू शकत नाही” असं जेलेंस्की यांनी टेलिग्रामवर लिहिलं आहे. ज्या देशांना युद्ध संपवाव असं वाटतय, त्यांनी युक्रेनच्या भविष्याच्या सुरक्षेबद्दल आश्वासन दिलं पाहिजे, असे देखील जेलेंस्की म्हणाले आहेत.
व्हिडिओमध्ये काय ?
युक्रेनचे राष्ट्रपती जेलस्की यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अटे या शहराच्या रस्त्यावर नागरिक पडलेले दिसत आहेत. जापोरिज्जिया शहरात युक्रनेचा न्यूक्लियर प्लांट आहे. जखमी झालेल्या नागरिकांना इमरजन्सी सर्विसेसकडून प्रथोमोचार देताना दिसत आहे. तसेच जखमी झालेल्या नागरिकांना स्ट्रेचरवरून नेले जात आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील हा रशिया आणि युक्रेनचा संघर्ष मोठा असल्याचे म्हटले जात आहे.
https://twitter.com/ZelenskyyUa/status/1877019722564206687





