Maharashtra Doctors Strike: राज्यभरात निवासी डॉक्टरांचा संप; रुग्णालयातील सेवा विस्कळीत?
Maharashtra Doctors Strike: पुण्यातील ससून रुग्णालयातील 250 डॉक्टर संपामध्ये सहभागी

Maharashtra Doctors Strike: महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये बीएचएमएस-सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
कालपासून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा न निघाल्याने ते अधिक तीव्र झाले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) आवाहनानुसार खासगी डॉक्टरांनीही ओपीडी बंद ठेवून केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवल्या आहेत.
निवासी डॉक्टरांचा विरोध (Maharashtra Doctors Strike)
सीसीएमपी पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्यात येत असल्याने याला निवासी डॉक्टरांनी विरोध केला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी मार्डला पत्र पाठवून डॉक्टरांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन केले. ही ‘सशर्त नोंदणी’ न्यायालयीन आदेशांच्या पालनासाठी असून, सीसीएमपी पात्र होमिओपॅथी डॉक्टरांना एमबीबीएस पदवीधारकांप्रमाणे समानता किंवा अतिरिक्त लाभ दिले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Doctors Strike)
पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी (Maharashtra Doctors Strike)
मात्र, नोंदणी प्रक्रिया तातडीने थांबविल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका केंद्रीय मार्डचे अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे यांनी मांडली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नोंदणीची घाई का? हा लढा डॉक्टरांच्या हितासाठी नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑगस्ट रोजी होणार असून, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चेनंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. (Maharashtra Doctors Strike)
मुंबईतील पाच महापालिका रुग्णालये आणि जेजे रुग्णालयातील सुमारे ३,५०० निवासी डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर
पुण्यातील ससून रुग्णालयातील 250 डॉक्टर संपामध्ये सहभागी झाले आहे. यामुळे रुग्णालयातील सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
कोणत्या सेवा सुरू आणि कोणत्या बंद असणार? (Maharashtra Doctors Strike)
मार्डच्या निवेदनानुसार, गुरुवारपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर नियमित ओपीडी, आयपीडी, वॉर्ड फेऱ्या, नियोजित शस्त्रक्रिया, वैद्यकीय प्रक्रिया, शैक्षणिक उपक्रम, केंद्रीय प्रयोगशाळा आणि फिव्हर ओपीडी सेवा बंद ठेवणार आहेत. मात्र अपघात विभाग, ट्रॉमा केअर, आयसीयू, प्रसूती कक्ष, तातडीच्या शस्त्रक्रिया, रक्तपेढी, आपत्कालीन प्रयोगशाळा याय सेवा सुरू राहतील.
हेही वाचा:
Awarapan 2 trailer : प्रेमासाठी काहीपण! इम्रान हाश्मीच्या नव्या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित





