Operation Sindoor : मॉक ड्रिलमुळे गाफील राहिलेला पाकिस्तान झाला क्लीन बोल्ड !

Operation Sindoor : पाकिस्तानशी तणाव शिगेला पोहचल्याने भारतात सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यास काय दक्षता घ्यायची, कुठली पाऊले उचलायची यासाठी प्रशासन आणि यंत्रणांना सतर्क करण्यासाठीही महत्वाची कृती करण्यात आली.
त्याअंतर्गत देशभरात मॉक ड्रिल घेण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले. नागरिकांना सुरक्षिततेविषयी जागरूक करणे हाही त्यामागील हेतू होता. संबंधित आदेश ५ मे यादिवशी जारी करण्यात आला.
त्यानुसार, मॉक ड्रिलसाठी ७ मे हा दिवस निश्चित करण्यात आला. तो आदेश संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला. भारतातील त्या मॉक ड्रिलमुळे बहुधा पाकिस्तान गाफील राहिला. संपूर्ण भारत मॉक ड्रिलच्या तयारीत गुंतल्याचे बहुधा पाकिस्तानला वाटले असावे.
त्यामुळे मॉक ड्रिलचा दिवस उजाडण्याआधीच भारतीय सशस्त्र दलांनी केलेली कारवाई पाकिस्तानला पूर्णपणे क्लीन बोल्ड करणारी ठरली.





