Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’चा समावेश; विद्यार्थी शिकणार भारतीय लष्कराची शौर्यगाथा

Operation Sindoor | एनसीईआरटीने इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित दोन विशेष प्रकरणे जारी केली आहेत. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेबाबतची माहिती दिली जाणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षेवर भर | Operation Sindoor
अभ्यासक्रमात विशेषतः नमूद आहे की, भारताने केवळ दहशतवादी ठिकाणांनाच लक्ष्य केले, तर नागरिकांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. प्रत्येक लक्ष्याची दोनदा तपासणी करण्यात आली. यामुळे हा संदेश गेला की भारत दहशतवाद्यांना शिक्षेपासून वाचू देणार नाही.
इयत्ता ३ ते ८ साठी तयार केलेल्या मॉड्यूलचे शीर्षक आहे ‘ऑपरेशन सिंदूर – वीरतेची गाथा’, तर इयत्ता ९ ते १२ साठी ‘ऑपरेशन सिंदूर – सन्मान आणि वीरतेचे मिशन’ असे आहे. याचा उद्देश मुलांना भारताच्या सैन्य सामर्थ्य आणि सुरक्षा रणनीतीची माहिती करून देणे आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेले होते. या हल्ल्याचा एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात उल्लेख करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात म्हटलं आहे की, ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती. शांततेसाठी व स्वसंरक्षणासाठी उचललेलं पाऊल होतं. ही मोहीम भारतासाठी सन्मान व दृढनिश्चयाचं प्रतीक आहे.
सिंदूर असं नाव देण्यामागे काय आहे कारण ?
या लष्करी मोहिमेला सिंदूर असं नाव देण्यामागे शहिदांच्या पत्नींचा सन्मान कारणं हे उद्दीष्ट होतं. शहिदांच्या पत्नींनी देशासाठी केलेल्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल्याचं एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात म्हटलं आहे. Operation Sindoor |
ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हटलं?
भारताने ७ मे २०२५ रोजी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तिथे असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय हवाई दलाने एकूण नऊ तळ निश्चित केले आणि क्षेपणास्त्र हल्ला करून सर्व तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा भारताने केला आहे. Operation Sindoor |
हेही वाचा:





