Pune Rain : अनेक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी; पुण्यालाही पावसाचा रेड अलर्ट; पुण्यासाठी प्रशासनाकडून कोणता निर्णय?

Pune Rain : मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे. अजूनही पावसाचा जोर कायम आहे. मुंबई शहर, नवी मुंबई आणि ठाणे येथील परिस्थिती पावसामुळे बिकट बनली आहे. पावसामुळे काही मनुष्य बळी आणि जनावरे देखील दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या पावसामुळे काही जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता पुण्यासाठी कोणता निर्णय घेण्यात याबाबत बोललं जात आहे.
हवामान विभागानाने काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचं सांगितलं आहे. विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार पुण्याच्या घाट माध्यमावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात पावसाचा जोर कायम आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर धुव्वाधार पाऊस बरसत आहे. आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पुणे जिल्हा प्रशासनाकडून शहरामधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज पुणे शहरातील शाळा सुरूच राहणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यालाही पावसाने चांगलचं झोडपलं आहे. पुरंदर तालुक्यातही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. वाढत्या पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आलं आहे.
धरणं १०० टक्के भरली
यंदाच्या हंगामात ४ पुण्यातील काही धरणे १०० टक्के भरली आहेत. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे १०० टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून ३९ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे आता मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
एकतानगरमधील नागरिकांच्या घरात शिरले पाणी
शहरातील एकतानगर भागात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरले आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढत एनडीआरच्या जवानांकडून रेस्क्यू अॅापरेशन करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला ; जनसुनावणीदरम्यान अज्ञातांकडून मारहाण





