किश्तवाडनंतर जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये ढगफुटी; चार जणांचा मृत्यू, रस्तेही खचले

Jammu and Kashmir | किश्तवाडनंतर आता जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ढगफुटीची घटना शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री राजबाग येथील जोड घाटी गावात घडली. यामुळे गावाचा संपर्क तुटला असून काही मालमत्ता आणि जमिनीचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पोली आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांची संयुक्त पथके घटनास्थळी दाखल झाली असून स्थानिकांच्या मदतीने रविवारी सकाळी बचावकार्य सुरू होते. आत्तापर्यंत चार नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर सहा जखमी लोकांना बाहेर काढून त्यांना रुग्णलयात दाखल केले जात आहे. यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#WATCH | Jammu and Kashmir: A cloud burst incident took place in Kauthua’s Janglote area. 4 casualties reported: Union Minister Dr Jitendra Singh
(Visuals from the area en route to Kauthua’s Janglote area) pic.twitter.com/bUJFq9qJK0
— ANI (@ANI) August 17, 2025
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कठुआ पोलीस स्टेशन हद्दीतील बगड आणि चंगडा गावांमध्ये तसेच लखनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दिलवान-हुटली येथेही भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. मात्र, येथे कोणत्याही मोठ्या नुकसानाची माहिती नाही. मुसळधार पावसामुळे बहुतांश जलाशयांचे पाणीपातळी झपाट्याने वाढली असून उझ नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. Jammu and Kashmir |
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कठुआ येथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘जंगलोट परिसरात ढगफुटीची माहिती मिळाल्यानंतर कठुआचे एसएसपी शोभित सक्सेना यांच्याशी बोललो. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच रेल्वे ट्रॅक, राष्ट्रीय महामार्ग, कठुआ पोलिस स्टेशनचे नुकसान झाले आहे. नागरी प्रशासन, लष्कर आणि निमलष्करी दलाने मदतकार्य सुरू केले असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.’ तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे.Jammu and Kashmir |
अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले
कठुआचे उपायुक्त राजेश शर्मा यांनी सांगितले की, कठुआमध्ये ढगफुटीमुळे संकट निर्माण झाले आहे. जोध गावात ढगफुटीमुळे अचानक पूर आला. तिथे अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले आहे. अनेक रस्ते तुटले आहेत आणि गावांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही बंद झाला आहे. दरम्यान, याआधी किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत 60 जणांचा बळी गेला होता, त्यानंतर पुन्हा ढगफुटीची घटना घडली आहे.
हेही वाचा :
अमेरिकन ट्रेड डील टीमचा भारत दौरा रद्द, अमेरिका-भारताचा व्यापार करार पुन्हा अडचणीत





