Shirur News | ऑपरेशन सिंदूरचा पहिला तोफगोळा डागणाऱ्या जवानाकडून ध्वजारोहण

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – कुंभारआळी (शिरूर) येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिला तोफगोळा डागणारे शिरूरचे जवान राजेश गोपाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.भारत-पाक युद्धादरम्यान झालेल्या ऐतिहासिक ऑपरेशन सिंदूरमध्ये राजेश गोपाळ यांच्या रेजिमेंटने पहिला प्रतिहल्ला केला होता. या कारवाईत पाकिस्तानच्या लष्करी तळावर अचूक तोफगोळा मारण्यात आला. त्या प्रसंगाची आठवण गोपाळ यांनी उपस्थितांसमोर सांगितली.
कार्यक्रमात कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश जामदार यांनी स्वातंत्र्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, हे स्वातंत्र्य सहज मिळालेले नसून त्यामागे हजारो स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आहे, ते जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.छोट्या मुलांसाठी नितीन जामदार यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सेतू व्यवस्थापक शंकर जामदार, बाळासाहेब जामदार, दगडू त्रिमूखे, विजय शिर्के, संभाजी जामदार, राजकुमार जामदार, सुनील भावटणकर, संदीप कडेकर, संतोष जामदार, विनोद शिर्के, संजय कडेकर, विनायक जामदार, बाबुराव जामदार, सुनील शिर्के, विक्रम जामदार, दिपक शिर्के, राजेंद्र गोरडे, संजय राजापूरे, चरण जामदार, नितीन शिर्के यांच्यासह महिला भगिनींची उपस्थिती उल्लेखनीय होती.





