Satara | सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाचे खुले कवी संमेलन उत्साहात

सातारा, (प्रतिनिधी) – सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेलच्या सातारा शाखा कार्यकारिणीतर्फे सातारा येथील श्री. छ. प्रतापसिंह महाराज ( थोरले ) नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये खुले कवी संमेलन उत्साहात झाले.
याप्रसंगी सातारा शाखा कार्यकारिणी अध्यक्षपदासाठी सौ. अश्विनी कोठावळे, सचिवपदी मनीषा शिरटावले, उपाध्यक्षा म्हणून जयमाला चव्हाण, सल्लागारपदी डॉ. शुभांगी कुंभार, लता चव्हाण, कांता भोसले तर जिल्हा संघटक व प्रसिद्धी प्रमुख म्हणून अंजली गोडसे आणि सदस्य म्हणून सविता आंबवले, कादंबरी देवकर,
मंगल माने, शुभांगी शेळके, नरेंद्र निकम, शुभांगी पवार, सुषमा आलेकरी यांची आगामी तीन वर्षासाठी निवड करून नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
उपस्थित कवी आणि कवयित्रीपैकी नरेंद्र निकम, संगीता केंजळे, शुभांगी तरडे, डॉ. राजेश जोशी, सरिता व्यवहारे शुभांगी पवार यांनी विविध विषयावरील उत्कृष्ठ कविता सादर केल्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्रदीप कांबळे यांनी कवितेचा आशय, गाभा अर्थपूर्ण होऊन कवितेत प्रगल्भता कशी आणता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
कवी आबासाहेब पाटील यांनी कवितेचे आशयघन सादरीकरण कसे करावे? या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांनी शब्दवेलचे उपक्रम स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त राबविण्याचा निश्चय केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा शिरटावले, अश्विनी कोठावळे, कादंबरी देवकर, जयमाला चव्हाण, शुभांगी कुंभार, शुभांगी वाघ, शुभांगी पवार, नरेंद्र निकम, लता चव्हाण आणि सुषमा आलेकरी यांनी विशेष प्रयत्न केले.
जयमाला चव्हाण, शुभांगी कुंभार व शुभांगी वाघ यांनी सूत्रसंचालन केले. रांगोळी रेखाटन कादंबरी देवकर यांनी केले. मनीषा शिरटावले यांनी आभार मानले.
शब्दवेलच्या सर्व उपक्रमांमध्ये जास्तीतजास्त साहित्यिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाचे अध्यक्ष प्रविण बोपुलकर यांनी केले आहॆ.





