Amazon Prime Day 2025 : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन किंवा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. कारण ‘Amazon’ लवकरच त्यांचा सर्वात मोठा सेल ‘प्राइम डे २०२५’ घेऊन येत आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सपासून फॅशन, घरगुती उपकरणे आणि गॅझेट्सपर्यंत सर्व गोष्टींवर मोठी सूट मिळेल. विशेष म्हणजे यावेळी प्राइम डेमध्ये स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर बंपर ऑफर उपलब्ध असतील.
अमेझॉन ‘प्राइम डे २०२५’ कधी आहे?
अमेझॉन प्राइम डे सेल ‘१२ जुलै ते १४ जुलै २०२५’ पर्यंत चालेल. हा सेल फक्त प्राइम सदस्यांसाठी असेल. जर तुम्ही अमेझॉन प्राइम सदस्य असाल तरच तुम्ही या डीलचा लाभ घेऊ शकाल. या काळात तुम्ही आयसीआयसीआय आणि एसबीआय कार्डवर १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळवू शकता.
स्मार्टफोनवर उपलब्ध ऑफर्स :
प्राइम डे सेलमध्ये सॅमसंग, वनप्लस, रियलमी, रेडमी, आयक्यूओ आणि मोटोरोला सारख्या अनेक लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडवर मोठी सूट दिली जाईल.
रियलमी जीटी ७ प्रो ५जी: सेल सुरू होण्यापूर्वीच या फोनवर सुमारे १३,००० रुपयांची सूट मिळत आहे.
नथिंग फोन २: या फोनची किंमत ४५,००० रुपयांवरून सुमारे २८,००० रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस२४ एफई: या फोनवर ३०,००० रुपयांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे.
काही डीलमध्ये एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय देखील असेल, ज्यामुळे तुम्हाला महागडे फोन खरेदी करणे सोपे होईल.
लॅपटॉपवर जबरदस्त ऑफर्स :
जर तुम्हाला अभ्यास, ऑफिस किंवा गेमिंगसाठी लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुम्हाला Amazon Prime Day सेलमध्ये अनेक उत्तम डील मिळतील. HP आणि Asus स्टुडंट लॅपटॉपवर ३५ ते ५० टक्के सूट मिळत आहे. Acer Predator Helios Neo १६ सारख्या गेमिंग लॅपटॉपवर ४० टक्क्यांहून अधिक सूट मिळत आहे.
Samsung Galaxy Book आणि इतर पोर्टेबल ऑफिस लॅपटॉपवरही उत्तम डील पाहता येतील. यापैकी अनेक लॅपटॉपवर नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जातील.
सर्वोत्तम डील कसे मिळवायचे? पाहा…
सेलमधील सर्व डीलचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्राइम मेंबरशिप घेऊ शकता. कार्ड ऑफर्स तपासा, तुम्हाला ICICI किंवा SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यास अतिरिक्त सूट मिळेल. आगाऊ इच्छा यादी तयार करा, जेणेकरून तुम्ही सेल सुरू होताच लवकर ऑर्डर करू शकाल. लाइटनिंग डीलवर लक्ष ठेवा. हे डील काही मिनिटांत संपतात.