Online Games : ऑन लाईन गेमींगवरही आता 28 टक्के जीएसटी

नवी दिल्ली – ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेस क्लबमधील बेट्सच्या पूर्ण दर्शनी मूल्यावर आता 28 टक्के जीएसटी लागू केला जाणार आहे. या विषयीचे एक दुरूस्ती विधेयक आज संसदेत मंजूर करण्यात आले.
राज्यसभेने दोन्ही प्रस्तावित कायदे कोणतीही चर्चा न करता आवाजी मतदानाने लोकसभेकडे परत पाठवले होते. लोकसभेने केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सुधारणा) विधेयक, 2023 आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (सुधारणा) विधेयक,
2023 या दोन विधेयकांना मंजुरी दिली.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही विधेयके दोन्ही सभागृहात मांडली. शुक्रवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. राज्यांना आता आपआपल्या विधानसभांमध्ये जीएसटी कायद्यांमध्ये झालेल्या दुरूस्त्या मंजुर करून घ्याव्या लागणार आहेत.
केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) आणि एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) कायद्यातील या दुरूस्त्यांना जीएसटी परिषदेने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती.





