Satara | फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल
Updated On:

फलटण, (प्रतिनिधी ) – फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी ११ जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले असून १ अपक्ष उमेदवारांने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कांचनकन्होजा धोंङिराम खरात यांनी पक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवङणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी ११ जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले असून एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही





