पुणे-सोलापूर महामार्गावर दुचाकीस्वाराला धमकावून लुटले
Updated On:

पुणे : दुचाकीस्वाराला धमकावून त्याच्याकडील रोकड आणि मनगटी घड्याळ असा ऐवज चोरट्यांनी लुटल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर घडली.
अप्पासाहेब डोके (वय २९, रा. धुमाळवाडी, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दुचाकीस्वार डोके रात्री साडेआठच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरून निघाले होते. हडपसरमधील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर अंधारात दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी डोके यांना धमकावले. रस्त्यावर गाडी का थांबविली, अशी विचारणा करून चोरट्यांनी धमकावण्यास सुरुवात केली.
डोके यांच्या खिशातील दोन हजारांची रोकड आणि मनगटी घडयाळ असा साडेचार हजारांचा ऐवज चोरट्यांनी काढून घेतला. चोरटे पसार झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर तपास करत आहेत.





