७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वाय.जे.ओ.सी. पुणे क्लबतर्फे मोटरसायकल रॅली

पुणे – १५ ऑगस्ट २०२४ रोजी येझदी जावा ओनर्स क्लब (वाय.जे.ओ.सी), पुणे क्लबने ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सारसबाग, पुणे येथून जीवन वर्धिनी निवासी मतिमंद विद्यालय, दिवे, सासवडरोड पर्यंत मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले. या रॅलीद्वारे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण समारंभ वाय.जे.ओ.सी. पुणे क्लब चे संस्थापक सदस्य भाऊ साटलकर, अण्णा माने, आणि बबन दीक्षित यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर शाळेतील मुलांनी देशभक्तीपर गीते सादर केली आणि स्वातंत्र्य वीरांची वेशभूषा, रांगोळी अशा अनेक कार्यांत सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमयी झाले.
शाळेचे संस्थापक श्री. झेंडे सर यांनी वाय.जे.ओ.सी. पुणे क्लब च्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि क्लबकडून गेल्या ५-६ वर्षांपासून होत असलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल आभार व्यक्त केले.
वाय.जे.ओ.सी. पुणे क्लब ने शाळेला संस्थेसाठी आवश्यक असलेले साहित्य व धनादेश देऊन तसेच क्लब चे सदस्य नितीन शुक्रे यांनी स्वेच्छेने खाऊ वाटपाचा खर्च उचलून सामाजिक बांधिलकी जपली. तरी वाय.जे.ओ.सी. पुणे क्लब ने इतरांनीही शाळेला मदत करावे व इच्छुकांनी आवर्जून संस्थेशी संपर्क साधावा असे आव्हान केले.
रॅली चे आयोजन संदीप कटके, राहुल हंकारे, निखिल कटके, नितीन शुक्रे व मंदार फडके यांनी केले होते. रॅलीदरम्यान काही मेंबर्स सातारा मधून खास ह्या कार्यक्रमासाठी आले होते रॅली दरम्यान सर्व वाहतूक आणि सुरक्षिततेचे नियम पाळून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.




