OMG 3 : OMG 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार; अक्षय कुमार असणार का? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं

OMG 3 : OMG 2 चे दिग्दर्शक अमित राय यांनी सिनेमाच्या पुढच्या सिक्वेलविषयी मोठी अपडेट दिली आहे. 2012 मध्ये OMG अर्थात ओह माय गॅाड हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यानंतर या सिनेमाचा पुढचा सिक्वल तब्बल 11 वर्षांनी 2023 मध्ये रिलीज झाला. आता या सिनेमाचा पुढचा सिक्वल अर्थात OMG 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
OMG 2 सिनेमाचे दिग्दर्शक अमित राय यांनी एनआयशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी OMG 3 सिनेमाबाबत हिंट दिली आहे. या सिनेमावर काम सुरू असून, 2026 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हा सिनेमा मागच्या दोन भागांपेक्षा खूप मोठा असणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार असणार की नाही याबाबतही त्यांनी खुलासा केला आहे.
काय म्हणाले दिग्दर्शक?
हा सिनेमा मागच्या भागांपेक्षा खूप मोठा असणार आहे. त्याचा पुढचा भाग लवकरच येणार आहे. सिनेमावर काम सुरू असून तो पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल, असं दिग्दर्शक अमित राय यांनी जाहीर केलं आहे. अक्षय कुमार या सिनेमात असेल का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी तो असेल. तो या सिनेमाचा निर्माता असल्याचं सांगितलं.
2012 मध्ये रिलीज झालेल्या OMG या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार, परेश रावल यांच्या कमेस्ट्रीचं कौतुक करण्यात आलं होतं. मात्र, सिनेमातील काही सीनमुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. याानंतर तब्बल 11 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल 2023 मध्ये रिलीज करण्यात आला. हा सिनेमा लैंगिक शिक्षणावर भाष्य करणारा आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत होते.
हेही वाचा : ट्रम्पच्या घोषणेने एका झटक्यात सोन्याचा दरात मोठी घसरण ; सोने खरेदीचा आजचा मुहूर्त चुकवू नका, वाचा आजचे भाव





