अक्षय कुमारसोबत काम केलेल्या अभिनेत्रीचा धाडसी निर्णय; टक्कल करत दिला समाजाला मोठा संदेश

Shanti Priya | दाक्षिणात्य अभिनेत्री शांती प्रियाचा नवा लुक समोर आला आहे. शांतीने एक धाडसी पाऊल उचलत स्वत:चे टक्कल केले आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती नव्या अवतारात दित आहे. या नव्या लुकद्वारे तिने समाजाला एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रियाचा पती सिद्धार्थ रे याचे 2004 मध्ये निधन झाले. या फोटोमध्ये तिने सिद्धार्थचे ब्लेझर घातलं आहे, सोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी अलीकडेच टक्कल केलं आणि माझा अनुभव खूपच चांगला आहे. महिला म्हणून आपण अनेकदा आयुष्यात मर्यादा घालतो, नियमांनुसार चालतो आणि स्वतःला पिंजऱ्यातही ठेवतो.
View this post on Instagram
या परिवर्तनासह, मी स्वतःला मुक्त केलं आहे, मर्यादांपासून मुक्त केलं आहे आणि जगाने आपल्यावर लावलेल्या सौंदर्य मानकांना तोडण्याचा माझा हेतू आहे आणि मी ते माझ्या मनातील खूप धैर्याने आणि विश्वासाने करते,” असे म्हणत तिने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. Shanti Priya |
याशिवाय तिने पोस्टमध्ये “आज मी माझ्या दिवगंत पतीची आठवणही सोबत ठेवली आहे. त्याच्या ब्लेजरमधून मला आजही त्याची ऊर्जा मिळत आहे,” असेही म्हंटले आहे. काही नेटकऱ्यांनी तिच्या या नव्या लूकचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र उगाच प्रथांच्या विरोधात गेल्याने टीका केली आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. Shanti Priya |
दरम्यान, शांती प्रिया १९९१ मध्ये आलेल्या ‘सौगंध’ चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत अक्षय कुमार होता. याशिवाय तिने हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.
हेही वाचा:





