‘कन्नप्पा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; अक्षय कुमार दिसणार महादेवाच्या रूपात

Kannappa Movie Trailer | मुकेश कुमार सिंह दिग्दर्शित ‘कन्नप्पा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात अक्षय कुमारने महादेवाच्या भूमिकेत सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटात अभिनेता विष्णु मान्चू यांनी कन्नप्पा या नास्तिक योद्ध्याची भूमिका केली आहे. या ट्रेलरमध्ये कन्नप्पाचा शिवभक्त होण्यापर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो.
2 मिनिटे आणि 55 सेकंदांच्या ट्रेलरची सुरुवात ‘कन्नप्पा’ पासून होते, जो देवाच्या अस्तित्वाला नाकारतो आणि आपल्या गावातील लोकांना दुष्ट हल्लेखोरांपासून वाचवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतो. ट्रेलरमध्ये ‘भगवान शिव’ यांची एक झलक दिसते, ज्याची भूमिका अक्षय कुमार यांनी साकारली आहे, ज्यांनी खुलासा केला की ‘कन्नप्पा’ हे त्यांचे कट्टर भक्त बनणार आहेत.
ट्रेलर दाखवतो की, कसा एक कट्टर नास्तिक शिवाचा सर्वात मोठा भक्त बनतो. यात अभिनेता प्रभास ‘रुद्र’ या महत्त्वपूर्ण पात्रात दिसतो, जो महादेवाचं रुप म्हणून पृथ्वीवर कार्य करतो. तर मोहनलाल ‘किरात’ या शक्तिशाली व्यक्तिमत्त्वात दिसणार आहेत. अल्पावधीत या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. Kannappa Movie Trailer |
‘कन्नप्पा’ कधी रिलीज होणार ?
‘कन्नप्पा’ या चित्रपटात मुख्य कलाकारांमध्ये काजल अग्रवाल, मोहन बाबू, सरत कुमार, ब्रह्मानंदम सारख्या कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी तेलगूसोबत अन्य भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ‘कन्नप्पा’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच इंदौरमध्ये होणार होता, परंतु अहमदाबाद विमान अपघातानंतर अक्षय कुमार-विष्णु मांचू या दोघांनी हा ट्रेलर लाँच पुढे ढकलला आहे. Kannappa Movie Trailer |
हेही वाचा:





