NZ vs PAK Pakistani Players Trolled On Social Media Memes Viral : हॅगली ओव्हल येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला फक्त ९१ धावांत गुंडाळले. न्यूझीलंडमधील पाकिस्तानची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडने केवळ १०.१ षटकांत लक्ष्य गाठले. या पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या खेळाडूंना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव –
न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि काइल जेमिसन यांनी शानदार गोलंदाजी केली, तर टिम सेफर्टने स्फोटक फलंदाजी केली.
न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात पाकिस्तानसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हती. पहिला टी-२० सामना पूर्णपणे एकतर्फी होता. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध झाले. पाकिस्तानच्या फलंदाजांची कामगिरी खूपच निराशाजनक होती. कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही.
परिणामी, संपूर्ण संघ १८.४ षटकांत फक्त ९१ धावांवर गारद झाला. ही धावसंख्या पाकिस्तानची न्यूझीलंडमधील आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आहे. खुसदिल शाहने सर्वाधिक ३२ धावा केल्या, तर जहांदाद खानने १७ धावांचे योगदान दिले. उर्वरित फलंदाज काही खास करू शकले नाहीत. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कहर केला. जेकब डफीने ४ तर काइल जेमीसनने ३ विकेट्स घेतल्या. ईश सोधीने २ आणि झाचेरी फौल्क्सने १ विकेट्स घेतली.
हेही वाचा – Ishan Kishan : इशान किशनचा IPL 2025 पूर्वी मोठा धमाका! सराव सामन्यात चौकार-षटकारांचा पाडला पाऊस, पाहा VIDEO
न्यूझीलंडने पाकिस्तानवर ९ विकेट्सनी सोपा विजय –
न्यूझीलंडसाठी ९२ धावांचे लक्ष्य अतिशय सोपे लक्ष्य ठरले. त्यांनी हे लक्ष्य फक्त १०.१ षटकांत पूर्ण केले. टिम सेफर्टने आक्रमक फलंदाजी करत २९ चेंडूत ४४ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि १ षटकार होता. फिन अॅलन २९ आणि टिम रॉबिन्सन १८ धावांवर नाबाद राहिले. पाकिस्तानला फक्त एकच विकेट घेत आली, जी अबरार अहमदने घेतली.
लज्जास्पद कामगिरीसाठी पाकिस्तान सोशल मीडियावर ट्रोल –
Pakistan’s batting lineup without Babar & Rizwan be like :#PakistanCricket #PAKvsNZ #BabarAzam pic.twitter.com/aSdqp7ujuJ
— Rishabh Pant Fc💙 (@17_imyogi) March 16, 2025
Fearless Cricket…😂😂
Never a dull moment in #PakistanCricket #PAKvNZ #PAKvsNZ pic.twitter.com/XpoDq8IW4P
— Shivam Pandey🇮🇳❤️ (@ShivamPandey__7) March 16, 2025
हा पराभव पाकिस्तानसाठी खूप लज्जास्पद होता. त्यांच्या फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही विभागाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. न्यूझीलंडने प्रत्येक विभागात पाकिस्तानला मागे टाकले. या विजयामुळे न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढेल, तर पाकिस्तानला त्यांच्या रणनीतीचा पुनर्विचार करावा लागेल. या सामन्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघाची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहेत.
Fearless Cricket 😂😂
Never a dull moment in #PakistanCricket #PAKvNZ pic.twitter.com/ltVGu6GYSJ
— Ash (@Ashsay_) March 16, 2025
🤣🤣🤣 pic.twitter.com/k7FJXWOntA
— Pip_Quips (@Pip_Quips) March 16, 2025
न्यूझीलंडमधील टी-२० मालिकेची सुरुवात पाकिस्तानसाठी खूपच वाईट झाली. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. यानंतरही त्यांच्या गोलंदाजांनाही काही खास करता आले नाही. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.