Mohammed Shami Daughter : ‘होळीचा सण साजरा करणे गुन्हा…’, शमीच्या मुलीने होळी खेळल्याने मौलाना संतापले; म्हणाले, ‘मुस्लिमांनी…’

Mohammed Shami Daughter Holi celebration : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. यापूर्वी, शमी रमजानच्या महिन्यात उपवास न केल्यामुळे चर्चेत आला होता. आता, त्याच्या मुलीने होळी खेळल्याची चर्चा आहे. शमीच्या मुलीने तिच्या आईसोबत रंगांनी होळी खेळली. यानंतर यूपीमधील बरेलीचे मौलाना यांनी व्हिडीओ शेअर करुन मोहम्मद शमीवर टीका केली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
रमजानमध्ये सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीने एनर्जी ड्रिंक पिण्यावर यूपीच्या एका मौलानाने वादग्रस्त विधान केले होते. आाता त्याच ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी आता शमीच्या मुलीच्या होळी खेळण्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. त्यांनी हे शरियतच्याविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. ज्यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे.
मौलाना शहाबुद्दीन रझवी काय म्हणाले?
#WATCH | Bareilly, UP: President of All India Muslim Jamaat, Maulana Shahabuddin Razvi Bareilvi says, "…One of the compulsory duties is 'Roza' (fasting)…If any healthy man or woman doesn't observe 'Roza', they will be a big criminal…A famous cricket personality of India,… pic.twitter.com/RE9C93Izl2
— ANI (@ANI) March 6, 2025
शनिवारी संध्याकाळी उशिरा शेअर करण्यास आलेल्या व्हिडाओमध्ये मौलाना रझवी म्हणाले की, “शमीची मुलगी आयरा हिने होळी खेळणे हे शरियतच्या विरोधात आहे. ते म्हणाले की, ती एक लहान मुलगी आहे, जर तिने अजानतेपणी होळी खेळली असेल तर ठीक आहे. पण जर तिला समज असतानाही तिने जाणूनबुजून होळी खेळली असेल तर हा शरियतनुसार गुन्हा आहे.”
होळी हिंदूंसाठी मोठा सण –
मौलाना रझवी पुढे म्हणाले की त्यांनी शमीला आधीही सल्ला दिला होता, पण तरीही तिच्या मुलीचा होळी खेळण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ते म्हणाले, “मी शमीसह कुटुंबातील सर्व सदस्यांना आवाहन केले आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना शरियतमध्ये नसलेले काहीही करू देऊ नये. होळी हा हिंदूंसाठी एक मोठा सण आहे, परंतु मुस्लिमांनी होळी खेळणे टाळावे. कारण जर कोणी शरियत माहित असूनही होळी खेळला, तर तो गुन्हा आहे.”





