NZ vs ENG 3rd Test : न्यूझीलंडचा इंग्लंडवर 423 धावांनी मोठा विजय, ‘टिम साउदी’ला दिला संस्मरणीय निरोप…

NZ vs ENG 3rd Test : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका पाहुण्या इंग्लिश संघाने जिंकली असली तरी यजमान न्यूझीलंडने मालिकेतील शेवटचा सामना 423 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून घरच्या मैदानावर क्लीन स्वीपपासून स्वतःला वाचवले. अशाप्रकारे इंग्लंडने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.
हा विजय किवी संघाचा स्टार खेळाडू टिम साउदीसाठी संस्मरणीय ठरला, कारण हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना होता. या सामन्यात साउदीने एकूण 2 बळी घेतले. दरम्यान, किवी संघाने दुसऱ्यांदा 423 धावांनी कसोटी जिंकली आहे. धावांच्या फरकाने त्यांचा हा सर्वात मोठा संयुक्त विजय आहे. याआधी किवी संघानं श्रीलंकाविरूध्द (क्राइस्टचर्च ,2018) 423 धावांनी विजय मिळवला होता.
Seeing a great off in style!
Mitch Santner (4-85), Tim Southee (2-34), Matt Henry (2-62) and Will O’Rourke (1-37) leading the final innings with the ball. Catch up on all scores | https://t.co/gATDuNhj6S 📲 #NZvENG #CricketNation 📸 pic.twitter.com/xbGBqMTMAe
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 17, 2024
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने पहिल्या डावात स्कोअर बोर्डवर 347 धावा लगावल्या होत्या. किवी संघाकडून मिचेल सँटनरने 76 धावा, टॉम लॅथमने 63 धावा आणि केन विल्यमसनने 44 धावा केल्या. इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्सने 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात इंग्लिश संघ पहिल्या डावात अवघ्या 143 धावांवर गारद झाला. एकाही फलंदाजाला 40 चा टप्पा ओलांडता आला नाही. त्याचवेळी, न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 4 आणि ओ’रुर्के आणि सँटनरने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. किवी संघाला 204 धावांची आघाडी मिळाली होती, मात्र असे असतानाही त्यांनी इंग्लंडला फॉलोऑन दिला नाही.
दुसऱ्या डावात केन विल्यमसनच्या 156 आणि विल यंग आणि डॅरिल मिशेलच्या प्रत्येकी 60-60 धावांच्या जोरावर किवींनी 453 धावा केल्या आणि इंग्लंडला 658 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 234 धावांत ऑलआऊट झाला आणि न्यूझीलंडने 423 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. इंग्लंडकडून जेकब बेथेलने 76 आणि जो रूटने 54 धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर मॅट हेन्री आणि टीम साऊदीनं प्रत्येकी दोन गडी बाद केले.
NZ vs ENG : केन विल्यमसननं शतक झळकावून रचला इतिहास, अनेक मोठे विक्रम काढले मोडित; 147 वर्षात प्रथमच…
हॅरी ब्रूक ठरला ‘प्लेअर ऑफ द सिरीज….
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हॅरी ब्रूकला प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब देण्यात आला. हॅरी ब्रूकनं या कसोटी मालिकेत एकूण 350 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावलं. त्याचवेळी, शेवटच्या कसोटीतील उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीबद्दल मिचेल सँटनरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या सामन्यात मिचेल सँटनर याने अष्टपैलू कामगिरी करताना गोलंदाजीत एकूण (3+4) सात तर फलंदाजीत (76+49) एकूण 125 धावा केल्या.





