NZ vs ENG 1st Test : इंग्लंडने टी-20 स्टाईलनं जिंकली पहिली कसोटी, न्यूझीलंडचा 8 विकेट्सनं उडवला धुव्वा…..

New Zealand vs England 1st Test Match Result : क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. इंग्लंडने हा कसोटी सामना T20 शैलीत जिंकला. किवी संघाने दिलेले लक्ष्य इंग्लंडने अवघ्या 12.4 षटकांत 2 गडी गमावताना पूर्ण केले. इंग्लंडने त्यांच्या बेजबॉल स्टाईलने हा सामना जिंकत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात 10 विकेट घेणाऱ्या ब्रायडन कार्सला सामनावीराचा किताब मिळाला.
England chase 104 in just 12.4 overs to seal an emphatic win in Christchurch!https://t.co/tm6DkpHyrB | #NZvENG pic.twitter.com/miSCWBpFnb
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 1, 2024
बेझबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध आपल्या परिचित शैलीत विजय मिळवला. पहिल्या कसोटीत इंग्लंडसमोर 104 धावांचे लक्ष्य होते, जे पाहुण्या संघाने चौथ्या दिवशी अवघ्या 12.4 षटकांत पूर्ण केले. इंग्लंडने 104 धावा झटपट गाठायचं ठरुन आक्रमक सुरुवात करायचं ठरवलं. मात्र झॅक क्रॉली दुसऱ्याच ओव्हरमध्ये आऊट झाला.
त्यानंतर बेन डकेट आणि जेकब बेथल यांनी स्फोटक खेळी सुरूच ठरली. मात्र यादरम्यान डकेट 8 व्या षटकात 27 धावांवर बाद झाला. त्यानंतर बेथल आणि रुट या जोडीने इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवलं. इंग्लंडकडून जेकब बेथेलने अवघ्या 37 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. तर जो रूट 15 चेंडूत 23 धावा करून नाबाद परतला.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 348 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 499 धावा केल्या. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 171 धावांची खेळी खेळली. त्यानंतर दुसऱ्या डावात किवी संघाला केवळ 254 धावा करता आल्या. अशाप्रकारे इंग्लंडला केवळ 104 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी सहज गाठले.




