NZ vs ENG : केन विल्यमसननं शतक झळकावून रचला इतिहास, अनेक मोठे विक्रम काढले मोडित; 147 वर्षात प्रथमच…

NZ vs ENG 3rd Test (Kane Williamson Century) : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे, त्यातील तिसरा कसोटी सामना सेडॉन पार्क येथे खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावून इतिहास रचला. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 33 वे शतक आहे.
विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात एकाच मैदानावर सलग 5 शतके झळकावणारा विल्यमसन जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. याशिवाय सर्वात वेगवान 33 वे कसोटी शतक झळकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. विल्यमसन न्यूझीलंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा खेळाडूही ठरला आहे.
एकाच मैदानावर सलग सर्वाधिक कसोटी शतके….
केन विल्यमसनने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले. यासह विल्यमसन एकाच मैदानावर सलग 5 शतके झळकावणारा अव्वल खेळाडू ठरला. विल्यमसनने 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध 200 धावा, 2019 मध्ये इंग्लंडविरुद्ध 104 धावा, 2020 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 251 धावा, 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 133 आणि आता 2024 मध्ये न्यूझीलंडच्या सेडन पार्क मैदानावर इंग्लंडविरुद्ध 156 धावा केल्या आहेत. सेडन पार्कवर विल्यमसनचे हे 5वे कसोटी शतक आहे.
1. केन विल्यमसन : 5 शतक (सेडन पार्क, हॅमिल्टन)
2. महेला जयवर्धने : 4 शतक (कोलंबो, एसएससी)
3. डॉन ब्रॅडमन : 4 शतक (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
4. मायकेल क्लार्क : 4 शतक (ॲडलेड क्रिकेट ग्राउंड)
5. डेनिस क्रॉम्प्टन : 4 शतक (ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम)
6. मार्टिन क्रो : 4 शतक (बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन)
7. सुनील गावस्कर : 4 शतक (वानखेडे स्टेडियम, मुंबई)
8. जॅक कॅलिस : 4 शतक (किंग्समीड स्टेडियम, डर्बन)
9. मिसबाह-उल-हक : 4 शतक (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी)
10. गॅरी सोबर्स : 4 शतक (किंग्स्टन, जमैका)
सर्वात वेगवान 33 कसोटी शतके..
सर्वात वेगवान 33 कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत केन विल्यमसन जगात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या आधी रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर पहिल्या दोनमध्ये आहेत. विल्यमसननंतर युनूस खान आणि स्टीव्ह स्मिथचा क्रमांक लागतो. केन विल्यमसनने आपल्या 186व्या कसोटी डावात 33वे कसोटी शतक पूर्ण केले आहे.
रिकी पाँटिंग : 178 डाव, 33 शतक
सचिन तेंडुलकर : 181डाव, 33 शतक
केन विल्यमसन : 186 डाव, 33 शतक
युनूस खान : 194 डाव, 33 शतक
स्टीव्ह स्मिथ : 199 डाव, 33 शतक
न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक शतके
केन विल्यमसनने न्यूझीलंडमध्ये 20 कसोटी शतके झळकावून घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके लगावण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्यानंतर रॉस टेलर आणि जॉन राइट यांचा क्रमांक लागतो. यासोबतच त्याने न्यूझीलंडमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये 24 शतके झळकावण्याच्या रॉस टेलरच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
केन विलियमसन : 105* सामने, 186 डाव, 9276 धावा, 33 शतके
राॅस टेलर : 112 सामने, 196 डाव, 7683 धावा, 19 शतके
मार्टिन क्रो : 77 सामने, 131 डाव, 5444 धावा, 17 शतके
टाॅम लथम : 88* सामने, 158 डाव, 5834 धावा, 13 शतके
जाॅन राइट : 82 सामने, 148 डाव, 5334 धावा, 12 शतके





