NZ vs ENG 3rd Test (Day 3) | तिसऱ्या कसोटीत इंग्लंड पराभवाच्या उंबरठ्यावर, न्यूझीलंडने दिलं 658 धावांचे लक्ष्य…

NZ vs ENG 3rd Test (Stumps on Day 3) :- केन विल्यमसनच्या दमदार दीडशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 453 धावांचा डोंगर उभा केल्या. पहिल्या डावात न्यूझीलंडने केलेल्या 347 धावना प्रत्त्युत्तर देताना, इंग्लंडचा डाव 143 धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे न्यूझीलंडला 204 धावांची आघाडी मिळाली होती.
पहिल्या डावातील 204 व दुसऱ्या डावातील 453 अशी एकूण 658 धावांचे लक्ष्य इंग्लंडला विजयासाठी देण्यात आले होते. इंग्लंडने दुसऱ्या डावात 2 बाद 18 अशी सुरुवात केली आहे.
657 set! Scores from Kane Williamson (156), Will Young (60), Daryl Mitchell (60), Mitchell Santner (49), Tom Blundell (44) and Rachin Ravindra (44) to set a big target for the visitors! Follow play LIVE in NZ with TVNZ DUKE, TVNZ+, Sport Nation and The ACC. #NZvENG #CricketNation pic.twitter.com/ezGxZz1FzU
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 16, 2024
इंग्लंडला 143 धावांवर बाद केल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 453 धावा केल्या. केन विल्यमसनने 20 चौकार व 1 षटकारांच्या साहाय्याने 156 धावांची खेळी करताना न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्याला विल यंगने 60, डॅरिल मिचेलने 60, मिशेल सँटनरने 49 तर रचिन रवींद्र व टॉम ब्लंडेल यांनी प्रत्येकी 44 धावा करताना सुरेख साथ दिली.
इंग्लंडकडून जेकब बेथेलने 3, शोएब बशीर व बेन स्टोक्सने प्रत्येकी 2 तर मॅथ्यू पॉट्स, गस ऍटकिन्सन व जो रूट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या डावात इंग्लंडची निराशाजनक सुरुवात केली. झॅक क्रॉली (5) व बेन डकेट (4) हे झटपट बाद झाल्याने इंग्लंडची स्थिती 2 बाद 18 अशी झाली आहे. तिसऱ्या दिवसअखेर जेकब बेथल (09) व जो रूट (0) नाबाद राहिले.





