New Zealand vs England 2nd Test Match Highlights : भारतीय संघाविरुद्धच्या निर्भेळ मालिका विजयाच्या यशानंतर मायदेशी परतलेल्या न्यूझीलंड संघाचा इंग्लंडने धुव्वा उडवला आहे. वेलिंग्टन येथे पार पडलेली दुसरी कसोटी तब्बल 323 धावांनी जिंकत इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धचा मालिकेतील पहिला कसोटी सामना 8 विकेटने जिंकला होता. शतक आणि अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या हॅरी ब्रूकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
England take the win and claim the Tegel Test series in Wellington. We head to Hamilton for the third and final Test of the series starting on Saturday. Catch up on all scores | https://t.co/BM7kPKUW2C 📲 #NZvENG #CricketNation #Cricket pic.twitter.com/yLJ2BJ2bSA
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 8, 2024
महत्वाचे म्हणजे इंग्लंडने 16 वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. पाहुण्या संघाने यापूर्वी 2008 मध्ये न्यूझीलंडचा त्याच्यांच घरच्या मैदानावर 2-1 असा पराभव करून मालिका जिंकली होती. मालिकेतील तिसरी आणि अंतिम कसोटी 14 डिसेंबरपासून हॅमिल्टन इथे सुरू होत आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि प्रमुख गोलंदाज टीम साऊदीची ही अंतिम कसोटी असणार आहे.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 280 धावा केल्यानंतर न्यूझीलंडला 125 धावांत ऑलआउट केले होते आणि पहिल्या डावाच्या आधारे 155 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. त्याचवेळी दुसऱ्या डावात इंग्लंडने 6 बाद 427 धावांवर डाव घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी 583 धावांचे लक्ष्य दिले. मात्र, प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 259 धावांत सर्वबाद झाला.
न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टॉम ब्लंडेलने शानदार शतक झळकावले. यासाठी त्याने 102 चेंडूंचा सामना करत 13 चौकार आणि 5 षटकार ठोकले. त्यांच्याशिवाय न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात नॅथन स्मिथने 42 धावांचे, डॅरिल मिशेलने 32 धावांचे आणि ग्लेन फिलिप्सने 16 धावांचे योगदान दिले.
हॅरी ब्रूक आणि जो रूट ठरले विजयाचे नायक…
हॅरी ब्रूक आणि जो रूट हे इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाचे नायक ठरले. हॅरी ब्रूकने शतक (123) झळकावून इंग्लंडचा पहिला डाव सांभाळत ऑली पोप (66) सोबत 174 धावांची भागीदारी केली, तर दुसऱ्या डावात अर्धशतक (55) झळकावून संघ मजबूत स्थितीत नेला. त्याचवेळी पहिल्या डावात केवळ 3 धावा करून बाद झालेल्या बलाढ्य फलंदाज जो रूटने दुसऱ्या डावात शानदार शतक (106 धावा, 130 चेंडू, 11चौकार) झळकावून न्यूझीलंडसमोर 583 धावांचे लक्ष्य ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गस ऍटकिन्सन अन् ब्रेडॉन कार्सही चमकले…
इंग्लंडच्या गस ऍटकिन्सन आणि ब्रायडन कार्स यांनी पहिल्या डावात प्रत्येकी 4 खेळाडू बाद केले आणि न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 125 धावांत आटोपण्यात महत्वाची भूमिका बजावली, तर दुसऱ्या डावात बेन स्टोक्सने 3, तर ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. गस ऍटकिन्सनने दुसऱ्या डावात केवळ 1 बळी घेतला.