Hair Cutting : केसांसोबत आता खिशाला कात्री.! कटिंग, शेव्हिंगच्या दरांमध्ये मोठी वाढ; वाचा नवीन दर
इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या संघर्षामुळे सौंदर्य प्रसाधने (कंझ्युमेबल्स) आणि इतर साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

Hair Cutting – इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या संघर्षामुळे सौंदर्य प्रसाधने (कंझ्युमेबल्स) आणि इतर साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
याचा थेट फटका बसल्याने महाराष्ट्रातील नाभिक समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने कटिंग आणि शेव्हिंगसह इतर सेवांच्या दरांमध्ये २० टक्क्यांनी वाढ केली आहे. हे सुधारित दर शनिवारपासून (६ जून) लागू करण्यात आले आहेत. (Hair Cutting)
महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूरचे पदाधिकारी श्याम आस्करकर यांनी पीटीआयशी बोलताना या संदर्भातील माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सलून चालवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्यामुळे हा निर्णय घेणे भाग पडले आहे.
पश्चिम आशियात इराण-अमेरिका संघर्ष चिघळल्याने जागतिक आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली असून, ऑपरेटिंग खर्च कमालीचा वाढला आहे.
असे असतील नवीन दर (रुपयांमध्ये): (Hair Cutting)
हेअरकट (कटिंग): १८०
शेव्हिंग (दाढी): १२०
दाढी ट्रिमिंग: १५०
हेड मसाज (डोक्याची मालिश): १८०
हेअर वॉश (केस धुणे): १२०
फेशिअल: ७०० पासून सुरू
हेअर स्पा: ६००
सामान्यतः आम्ही दर दोन वर्षांनी जानेवारी महिन्यात दरांमध्ये सुधारणा करतो. मात्र, यावेळी सलूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या किमतीत अचानक झालेली प्रचंड वाढ पाहता, आम्हाला वर्षाच्या मध्यातच हे दर वाढवणे भाग पडले आहे, असे आस्करकर यांनी स्पष्ट केले. (Hair Cutting)
का अंदाजानुसार, महाराष्ट्रात सध्या १ लाखापेक्षा जास्त सलून आहेत. दरम्यान, ही दरवाढ सर्वसामान्य सलूनसाठी लागू असून यामध्ये प्रीमियम किंवा लक्झरी सलूनचा समावेश नाही. त्या ठिकाणी सामान्यत: कटिंगचे दर साधारणपणे ५०० रूपयांपासून पासून सुरू होतात.





