AI watch : आता रेल्वे स्थानकांवर ‘एआय’चा वॉच; प्रवाशांच्या सुरक्षेत होणार वाढ
AI watch | Railway station – भारतीय रेल्वेने आपली सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. देशातील ७ प्रमुख रेल्वे स्थानकात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रावर आधारित टेहळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मुख्य उद्देश रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वाढवणे असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम होणार आहे. यामुळे रेल्वे आणि रेल्वे परिसर सुरक्षेत मोठी वाढ होणार आहे.
ही अत्याधुनिक प्रणाली रेल्वे स्थानकात लावलेले सीसीटीव्ही कॅमे-यातून मिळणा-या व्हीडीओ फूटेजचे सातत्याने विश्लेषण करणार आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, फेशियल रेकग्निशन, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन, स्मार्ट लाइटिंग आणि ड्रोनद्वारे जोखीम क्षेत्रांचे निरीक्षण केले जाणार आहे.
या तंत्रज्ञानामुळे त्यांच्या डेटाबेसमध्ये दाखल सराईत गुन्हेगार, संशयित आणि बेपत्ता व्यक्तींचा चेह-याशी लाईव्ह फुटचे तुलना होईल. अशा व्यक्ती कॅमे-यात कैद होताच सिस्टीम सुरक्षा एजन्सींना अलर्ट पाठवेल. या तंत्रज्ञानामुळे केवळ आरोपींना पकडण्याचा उद्देश नाही, तर बेपत्ता मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना शोधण्यात हे तंत्रज्ञान मोठी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
हे तंत्रज्ञान त्यांच्या चेह-यांना ओळखून संबंधित अधिका-यांना सूचना देईल. ज्यामुळे अशा बेपत्ता व्यक्तींना शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत सोपवणे सोपे होईल. रियल टाईम निगरानी आणि जलद प्रतिक्रीयामुळे रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था पहिल्यापेक्षा चोख होणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात 7 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात येणार असून त्यात मुंबई सीएसटी, नवी दिल्ली यांचा समावेश आहे.





