Nora Fatehi : अभिनेत्री ‘नोरा फतेही’ची आज ईडी कडून चौकशी; अडचणी वाढण्याची शक्यता….

मुंबई – सुकेश चंद्रशेखर या प्रकरणात ईडीचे अधिकारी सर्वांचीच कसून चौकशी करत आहेत. यामध्ये अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांचाही समावेश असून या दोघींची ही सतत चौकशी करण्यात येत आहे. अश्यातच आज पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची चौकशी होणार असून, यासाठी अभिनेत्री नुकतीच ईडीच्या कार्यालयात दाखल झाली आहे. 200 कोटींची फसवणूक आणि सुकेश चंद्रशेखर प्रकरणात चौकशीसाठी नोरा फतेही दिल्लीच्या अंमलबजावणी संचालनालयात पोहोचली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीची यापूर्वीही अनेकदा चौकशी झाली आहे. ईडी नोराची पाचव्यांदा चौकशी करत आहे. दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवून आहे. अलीकडेच सुकेशची मॅनेजर पिंकी इराणीलाही दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, यावेळी दिल्लीच्या ईडीच्या कार्यलयात पोहोचलेल्या नोरानं निळ्या रंगाची जीन्स आणि ब्राउन रंगाचं टॉप परिधान केलं आहे. नोराची चौकशी करण्याची ही पहिली वेळ नाही तर या आधीही तिची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुकेश चंद्रशेखर असून, नोराला या केसमध्ये माफीची साक्षीदार बनवलं जाणार आहे. नोरा फतेहीसह जॅकलिन फर्नांडिसही या प्रकरणात आरोपी आहे.





