नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; संजय राऊतांवरील ‘ते’ विधान भोवणार

Nitesh Rane Vs Sanjay Raut| भाजप नेते नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांच्याविरोधात माझगाव कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
संजय राऊत यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्या मार्फत नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीला नितेश राणे अनुपस्थित होते. यापूर्वी जानेवारी महिन्यात न्यायालयाने नितेश राणे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. Nitesh Rane Vs Sanjay Raut|
मात्र न्यायालयाने जानेवारी महिन्यात जारी केलेले वॉरंट रद्द केले होते कारण नितेश राणे फेब्रुवारी महिन्यात हजर झाले होते. पण त्यानंतर पुन्हा नितेश राणे हजर झाले नाही. त्यांनी वेगवेगळी कारणे सांगत न्यायालयात हजर राहता येणार नाही असं सांगितलं होतं.
१७ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहावे लागणार
दरम्यान, न्यायालयाने हजर राहण्याची सूट मागणारी नितेश राणेंची याचिका मंगळवारी फेटाळून लावण्यात आली. यानंतर संजय राऊत यांच्या वकिलांनी नितेश राणेंच्या विरोधात वॉरंट जारी करण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज स्वीकारत या प्रकरणी पुढची सुनावणी १७ ऑक्टोबरला घेणार असल्याचं सांगितले. त्यामुळे नितेश राणेंनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. Nitesh Rane Vs Sanjay Raut|
काय म्हणाले होते नितेश राणे?
नितेश राणे यांनी गेल्या वर्षी संजय राऊत यांना ‘साप’ म्हटलं होतं. ‘संजय राऊत एक असा साप आहेत जे एक महिन्याच्या आत शिवसेना ठाकरे गटाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील’ असं म्हटलं होतं. हे वक्तव्य अपमानास्पद आणि खोटं असल्यानं नितेश राणेंविरोधात कारवाई करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्याप्रकरणी सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी नितेश राणे यांच्याविरोधात कोर्टाने वॉरंट जारी केले आहे.
हेही वाचा:
पॅरिस ऑलिम्पिकमधून आणखी एक माहिती समोर; कुस्तीपटू अंतिम पंघालवर कारवाई, पॅरिस सोडण्याचे दिले आदेश





